no images were found
स्कोडा ऑटो इंडियाने कुशक ओनिक्स एटी केली लाँच
कोल्हापूर : स्कोडा ऑटो इंडियाने सातत्यपूर्ण उत्पादन कृतींच्या धोरणांतर्गत आपल्या ५-स्टार सुरक्षित ताफ्यामध्ये आणखी एका सुधारणेची भर करत कुशक ओनिक्स एटी लाँच केली आहे. ओनिक्स मूळत: ग्राहकांच्या अभिप्रायानुसार २०२३च्या पहिल्या तिमाहीत लाँच करण्यात आली होती, ज्यामागे स्कोडा चाहते व ग्राहकांना समाधान व उच्च मूल्य प्रदान करण्याचा मनसुबा होता. ग्राहकांकडून मिळालेल्या नवीन अभिप्रायाच्या आधारावर स्कोडा ऑटो इंडियाने आता ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि अनेक नवीन वैशिष्ट्यांसह कुशक ओनिक्समध्ये अधिक सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे तिच्या विभागातील ही सर्वात किफायतशीर ऑटोमॅटिक आहे. कुशाक ओनिक्स १.० टीएसआय ईटी ची एक्स-शोरूम किंमत रुपये १३,४९,००० आहे.
उत्पादन कृतीबाबत मत व्यक्त करत स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर जनेबा म्हणाले, ”ओनिक्स व्हेरिएण्ट आमच्या लाइन-अपमध्ये प्रमुख भर राहिले आहे, ज्यामध्ये अॅक्टिव्ह ट्रिमच्या मूल्यासह उच्च व्हेरिएण्ट्समधील वैशिष्ट्यांचे संयोजन आहे. ग्राहकांकडून मिळालेल्या अभिप्रायानंतर ही नवीन कुशक ओनिक्स ऑफरिंग सादर करण्यात आली आहे, ज्यामधून अधिक किफायतशीर दरामध्ये ऑटोमॅटिक व्हेरिएण्टसाठी उत्तम मागणी दिसून येते. खरेतर, आमचे मूल्य तत्त्व या कुशकला तिच्या संपूर्ण विभागातील सर्वात किफायतशीर ऑटोमॅटिक बनवते. त्रास-मुक्त मालकीहक्क अनुभव देणे, ग्राहकांपर्यंतची पोहोच अधिक वाढवणे आणि सतत ग्राहकांचे अभिप्राय ऐकणे हा आमचा प्रयत्न आहे आणि आमच्या विकास धोरणाचा प्रमुख भाग आहे.”
पूर्वीच्या ओनिक्सप्रमाणे ओनिक्स एटी स्कोडाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीच्या विद्यमान अॅक्टिव्ह व अॅम्बिशन व्हेरिएण्ट्स स्लॉटमध्ये सामील आहे. एक्स्टीरिअर्समध्ये उच्च अॅम्बिशन व्हेरिएण्टमधील वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे ही सर्वोत्तम कुशक आहे. यापैकी काही वैशिष्ट्ये आहेत स्कोडा क्रिस्टललाइन एलईडी हेडलॅम्प्ससह डीआरएल. दृश्यमानता व सुरक्षिततेमध्ये अधिक वाढ करणारी वैशिष्ट्ये आहेत फ्रण्ट फॉग लॅम्प्ससह स्टॅटिक कॉर्नरिंग फंक्शन. मागील बाजूस वायपर आणि डिफॉगर आहे. या सुधारणांसह स्कोडा ऑटो इंडियाने या वेईकलमध्ये टेक्टॉन व्हील कव्हर्स आणि बी-पिलर्समध्ये ‘ओनिक्स’ बॅजिंगची भर केली आहे.
ओनिक्स एटीच्या आतील बाजूस अधिक शाश्वत अपडेट्स करण्यात आले आहेत. यामध्ये अव्वलस्थानी आहे हिल होल्ड कंट्रोल आणि पॅडल शिफ्टर्स. ड्रायव्हरसाठी २-स्पोक, मल्टीफंक्शन, लेदर स्टीअरिंग व्हीलसह क्रोम स्क्रॉलर आहे. केबिनमध्ये स्कोडा क्लायमेट्रॉनिकसह टच पॅनेल आहे आणि पुढील बाजूस असलेल्या स्क्रफ प्लेट्समध्ये ‘ओनिक्स’ शब्द दिसून येतो. या कारच्या ग्राहकांना प्रमाणित म्हणून ओनिक्स-थीम कुशन्स व टेक्सटाइल मॅट्स देखील मिळतील. या उत्पादन अपडेटमधील नवीन वैशिष्ट्य म्हणजे ओनिक्स एटीमध्ये प्रमाणित म्हणून सहा एअरबॅग्ज आहेत.
कुशकमध्ये एमक्यूबी-एओ-इन प्लॅटफॉर्म आहे, जो विशेषत: भारत व झेक रिपब्लिकमधील टीम्सद्वारे भारतासाठी विकसित करण्यात आला. हा प्लॅटफॉर्म ९५ टक्के उच्च स्थानिकीकरण आणि प्रति किलोमीटर ०.४६ रूपयांपासून सुरू होणाऱ्या मालकीहक्काचा कमी खर्च यावरील फोकससह डिझाइन करण्यात आला. कुशक जुलै २०२१ मध्ये लाँच करण्यात आली आणि मार्च २०२२ मध्ये या प्लॅटफॉर्मवर स्कोडाचे दुसरे उत्पादन स्लाव्हिया सेदान लाँच करण्यात आली. कंपनीने २०२४ च्या सुरूवातीला या प्लॅटफॉर्मवर नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीची घोषणा केली. ही वेईकल २०२५ मध्ये पदार्पण करणार आहे.