no images were found
रक्तचित्र काढणे तामिळनाडू सरकारकडून कायद्याने गुन्हा
मद्रास : तामिळनाडू राज्यात ब्लड आर्टची क्रेझ कमालीची वाढल्याने राज्य सरकारने अखेर ब्लड पेंटिंगवर (रक्ताने काढलेले चित्र) बंदी आणली आहे. या राज्यात प्रियकर आपल्या प्रेयसीला वाढदिवसानिमित्त तिचे स्वत:च्या रक्ताने काढलेले चित्र भेट म्हणून देत असल्याचे अनेक प्रकार समोर आले. राज्य सरकारच्या आरोग्य विभागापर्यंत हा विषय धडकल्यानंतर २८ डिसेंबरला आरोग्यमंत्री एम. ए. सुब्रह्मण्यम् रक्ताने चित्र काढून देणार्या एका स्टुडिओत पोहोचले. रक्ताने भरलेल्या बाटल्या पाहून ते थक्क झाले आणि त्यांनी या स्टुडिओसह एकूणच ब्लड पेंटिंगवर बंदीची घोषणा केली.
रक्त काढण्याची प्रक्रियाही प्रोटोकॉलनुसार होत नाही. एकाच सुईचा वापर अनेकांचे रक्त काढण्यासाठी होतो. लोकांमध्ये इन्फेक्शन पसरण्याचा यात मोठा धोका आहे. ब्लड पेंटिंगची क्रेझ दिल्लीतील शहीद स्मृती चेतना समिती या संस्थेचे सदस्य रक्तदान करून देशभक्तांची चित्रे साकारत आहेत.रविचंद्र गुप्ता या दिल्लीतील व्यक्तीने १०० वर महापुरुषांची चित्रे साकारण्यासाठी आजवर रक्तदान केलेले आहे. रक्त काढण्याची परवानगी फक्त लॅब टेक्निशियन, फ्लेबोटोमिस्ट, नर्स तसेच फिजिशियनलाच आहे. हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी, एचआयव्ही हे आजार ब्लड पेंटिंग स्टुडिओतून पसरण्याचा धोका आहे.
चेन्नईतील एक कराटे मास्टर शिहान हुसैनी याने स्वत:च्या रक्ताने तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांची अनेक चित्रे साकारली होती. जयललिता यांनी शिहानला घरी बोलावून घेतले आणि तुला जागा खरेदी करायला ८० कोटी रुपये देईन म्हणून आश्वस्त केले. ब्लड आर्ट एक गुन्हा आहे. रक्तदान एक पवित्र कार्य आहे. तुम्हाला स्नेह, प्रेम दाखवायचे तर त्याच्या अनेक तर्हा आहेत. स्वत:च्या रक्ताने साकारलेले चित्र भेट देणे गैर आहे.