Home क्राईम ‘जलेबी बाबा’ला बलात्कार व सेक्स व्‍हिडिओ क्लिपप्रकरणी १४ वर्षे कारावासाची शिक्षा

‘जलेबी बाबा’ला बलात्कार व सेक्स व्‍हिडिओ क्लिपप्रकरणी १४ वर्षे कारावासाची शिक्षा

26 second read
0
0
164

no images were found

‘जलेबी बाबा’ला बलात्कार व सेक्स व्‍हिडिओ क्लिपप्रकरणी १४ वर्षे कारावासाची शिक्षा

फतेहाबाद : अंमली पदार्थ देवून शंभरहून अधिक महिलांवर बलात्कार करुन सेक्स व्‍हिडिओ क्लिप बनवल्याप्रकारणी हरियाणातील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु अमरपुरी ऊर्फ ‘जलेबी बाबा’ याला न्यायालयाने १४ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हरियाणाच्या फतेहाबाद येथील जलदगती न्यायालयाने हा निकाल दिला.
अमरपुरी ऊर्फ ‘जलेबी बाबा’ हा महिलांना त्यांच्या वैय्यक्तिक जीवनातील विविध समस्या सोडवण्याचे आमिष दाखवत असे. या आमिषाला बळी पडलेल्या महिला त्याच्या आश्रमात जात असत. समस्या सोडविण्‍याच्‍या बहाण्याने तो महिला व अल्पवयीन मुलींना अंमली पदार्थ देत असे. अंमली पदार्थामुळे शुद्ध हरपलेल्‍या महिला व अल्पवयीन मुलींचे त्याने लैंगिक शोषण करत असे. याच्या व्हीडीओ क्लिप बनवल्या. या व्हीडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो पीडित महिला व मुलींना पैशांसाठी ब्लकमेल करत असे. हरियाणा पोलिसांनी २०१८ मध्ये त्याला फतेहाबादच्या टोहाना शहरातून अटक केली. त्याच्या मोबाइल फोनमधून १२० कथित सेक्स व्हिडिओ क्लिप जप्त केल्या होत्या. या कारवाईने संपूर्ण हरियणात खळबळ माजली होती.
६३ वर्षीय अमरपुरी उर्फ ‘जलेबी बाबा’ याच्यावर १०० हून अधिक महिला व दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप होता. अल्पवयीन मुलींवर दोनवेळा बलात्कार केल्याप्रकरणी त्याच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदान्‍वये  (पॉस्‍को) गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. त्याला अटक करण्‍यात आली. न्यायालयाने त्‍याला ५ जानेवारी २०२३ रोजी या प्रकरणी दोषी ठरवले होते. अतिरिक्त जिल्ह्ला न्यायाधीश बलवंत सिंग यांनी पॉस्‍को कायद्यातील कलम ६ अन्वये १४ वर्षांचा तुरुंगवास, कलम ३७६ अन्वये दोन बलात्कार प्रकरणात प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सस्त्रास्त्र कायद्याच्या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात केली आहे, न्यायालयाने शिक्षा सुनावल्‍यानंतर ‘जलेबी बाबा’ न्यायालयाचा धाय माकलून रडला. निकालावेळी जलेबी बाबाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या सहा पीडित महिला न्यायालयात हजर होत्या . पीडितांच्या जबाबाच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिल्‍याचेही पीडितांच्या वकिलांनी सांगितले.
टोहना पोलीस ठाण्याचे तत्‍कालिन पोलीस निरीक्षक प्रदीप कुमार यांना एका खासगी गुप्तहेराने ‘जलेबी बाबा’चा कथित सेक्स व्हीडीओ दाखवला. यानंतर महिला व मुलींच्या लैंगिक शोषणाची धक्‍कादायक घटना उघडकीस आली होती. यानंतर पोलिसांनी स्‍वयंघोषित अध्‍यात्‍मिक गुरु अमरपुरी उर्फ ‘जलेबी बाबा’ याच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलामा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एकनाथ शिंदे यांना भाजप कडून कडून दोन ऑफर!

एकनाथ शिंदे यांना भाजप कडून कडून दोन ऑफर! राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…