Home राजकीय हिंदूंची श्रद्धास्थाने आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान आता सहन करणार नाही : मनोज खाडये

हिंदूंची श्रद्धास्थाने आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान आता सहन करणार नाही : मनोज खाडये

2 second read
0
0
35

no images were found

हिंदूंची श्रद्धास्थाने आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान आता सहन करणार नाही : मनोज खाडये

गडहिंग्लज :  आज कुणीही उठतो आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर टिका करतो, चिखलफेक करतो. ज्या छत्रपती संभाजी महाराज यांनी असंख्य यातना सोसून प्रार्णापण केले; मात्र धर्म पालटला नाही, अशा छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अजित पवार ‘छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून त्यांना स्वराज्यरक्षक म्हटले पाहिजे’, असे विधान करतात.
तसेच त्यांच्यातीलच लोक ‘छत्रपती शिवाजी महाराज हे जाणता राजा नव्हते’, ‘धर्मांध औरंजेब क्रूर नव्हता’, अशी विधाने जाणीवपूर्वक केली जात आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही ‘माफीवीर’ म्हणून टिका केली जात आहे. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या ‘मी हिंदू आहे; मात्र हिंदुत्वनिष्ठ नाही’, अशी विधाने करत आहे. केवळ राजकीय लाभासाठी, अशी विधाने केली जात आहे. या विधानांना सामान्य जनांमधून विरोध झाल्यावर सारवासारवी केली जाते. तरी येणार्‍या काळात हिंदूंची श्रद्धास्थाने आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाडये यांनी केले. ते गडहिंग्लज शहरात म.दु. श्रेष्ठी विद्यालय येथे आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभेत बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनीही मार्गदर्शन केले.
या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्या गावातील धर्माभिमानी असे ७ सहस्रपेक्षा अधिक हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरु स्वाती खाडये आणि उपस्थित मान्यवरांच्याा हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. वेदमूर्ती ऋषिकेश कापशीकर-जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. हिदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे आदित्य शास्त्री यांनी मांडला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विपुल भोपळे यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…