
no images were found
“संत मारो सेवालाल” बंजारा भाषेतील चित्रपट रुपेरी पडद्यावर
संत सेवालाल यांच्या जीवनकार्याचा वेध घेत सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा “संत मारो सेवालाल” हा चित्रपट १३ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट संपूर्णपणे बंजारा भाषेतील आहे.
माँ भवानी फिल्म आणि स्वामी स्टार आर्ट अँड प्रॉडक्शन निर्मित संत मारो सेवालाल या चित्रपटाची निर्मिती दीपाली भोसले सय्यद आणि फिल्मी सितारा प्रॉडक्शनच्या अशोक तुकारामराव कामले यांनी निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अरूण मोहन राठोड, जीतेश राठोड यांनी छायांकन आणि बबली हक यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आशुतोष राठोड यांनी संत सेवालाल यांची प्रमुख भूमिका साकारली आहे.
दुष्काळ, अडचणीत असलेला शेतकरी या समस्या मांडतानाच संत मारो सेवालाल यांचा जीवनपट, त्यांचे कार्य, त्यांनी दिलेला संदेश असे या चित्रपटाचं कथानक आहे. बंजारा समाजासाठी महत्त्वाचा असलेला हा चित्रपट संपूर्ण भारतीय प्रेक्षकांनाही विचार देणारा आहे. चित्रपटाचं टीजर पोस्टर अतिशय लक्षवेधी आणि संत मारो सेवालाल यांच्याविषयी कुतूहल निर्माण करणारं आहे.चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे त्यामुळेच हा चित्रपटदेखील नक्कीच लक्षवेधी ठरणार यात शंका नाही.