Home क्राईम ब्रम्हानंद पडळकर यांनी रात्रीत जेसीबी घालून दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर मिरजेच्या ‘त्या’ जागेवर आता मूळ मालकाचा दावा

ब्रम्हानंद पडळकर यांनी रात्रीत जेसीबी घालून दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर मिरजेच्या ‘त्या’ जागेवर आता मूळ मालकाचा दावा

0 second read
0
0
216

no images were found

ब्रम्हानंद पडळकर यांनी रात्रीत जेसीबी घालून दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर मिरजेच्या ‘त्या’ जागेवर आता मूळ मालकाचा दावा

मिरज : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांनी रात्रीत जेसीबी घालून दुकान गाळे जमीनदोस्त केल्यानंतर आता मूळ जागा मालक असल्याचा दावा करणारी एक व्यक्ती पुढे आली आहे. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीमध्ये तालुका दंडाधिकाऱ्यांनी बुधवारपर्यंत पाडकाम जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जमिनीची कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे.
या मोक्याच्या ज्या जागेवरील अतिक्रमण पाडले गेले त्या जागेचा आपण मूळ मालक असून जमिनीच्या मालकी हकाबाबत उच्च न्यायालयात केस सुरू आहे, असा दावा करणारी विष्णू लामदाडे ही व्यक्ती २ दिवसाच्या राड्यांन आज पुढे आली. तालुका दंडाधिकाऱ्यांनी पाडकामजैसे थे ठेवण्याचे आदेश देत दोन दिवसात जमिनीची कागदपत्रे सादर करण्याची दोन्ही गटाला मुदत दिली. मात्र, एकीकडे ही सुनावणी सुरु असताना आता मूळ मालक आपण असल्याचे सांगणारी व्यक्ती पुढे आल्याने गुंता आणखी वाढताना दिसत आहे.
तहसील कार्यालयात विष्णू लामदाडे ही व्यक्ती पुढे आली आणि त्याने डोळ्यात अश्रू आणत जो दावा केला त्यातून नवीन ट्विस्ट या वादात उभा झाला. पडळकर यांनी बेकायदेशीर जमीन खरेदी केली आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, पडळकर यांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप करत विष्णू लामदाडे यांनी आपल्यात आणि चड्डा यांच्यात या जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयात केस सुरू असल्याचे दावा केला. दरम्यान, विष्णू लामदाडे यांनी या जमिनीवर मालकी सांगणाऱ्या सगळ्यावर गुन्हा दखल करा अशीही मागणी केली.दरम्यान मिरज विधानसभा मतदारसंघाचे कामगार मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांनी त्यांच्या मतदारसंघात झालेल्या या प्रकाराबाबत प्रथमच भूमिका मांडली. जे मिरजमध्ये घडले ते योग्य नाही. प्रशासनाच्या माध्यमातून अतिक्रमण हटवता आले असते. रात्री अशा पध्दतीने अतिक्रमण हटवण्याची गरज नव्हती. भाजप पक्ष कुणालाही पाठीशी घालत नाही, चुकीचे असेल तर पक्ष त्यावर कारवाई करेल. ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना अटकही होईल असे खाडे म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…