no images were found
नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे एकाच व्यासपीठावर
मुंबई : राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी निर्माण करून देण्यासाठी नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून महास्वंयम रोजगार नोंदणी पोर्टल निर्मिती करण्यात आली आहे.
राज्यात बेरोजगारीचे किती भीषण वास्तव आहे याचा अंदाज पोलिस भरतीतून आला आहे. जवळपास शंभरावर अर्ज एका जागेसाठी अर्ज दाखल झाले आहेत. उच्चशिक्षितही पोलिस शिपाई भरतीच्या रांगेत दिसून आले. दरम्यान, महास्वंयम रोजगार नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत केली जाते. ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे अडचणीचे असेल किंवा सुविधा नसल्यास ऑफलाईन अर्ज करू शकतात.जवळच्या एम्पलॉयमेंट एक्स्चेंजला भेट देऊन माहिती भरता येईल.
दरम्यान, कमी कालावधीचे प्रशिक्षण असल्यास महाराष्ट्र राज्य स्किल डेव्हलपमेंट सोसायटीकडून प्रशिक्षण दिले जाते. जास्त कालावधीचे प्रशिक्षणासाठी व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय, यांच्या माध्यमातून दिले जाते. रोजगार मार्गदर्शन व चर्चा यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता संचालनालय यांच्याकडून सहकार्य केले जाते. स्टार्ट अप आणि इनोव्हेशनसाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून मदत केली जाते. कर्जासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून सहाय्य केले जाते.