no images were found
हिंसाचार,रक्तपातवाले फोटो,व्हिडीओ प्रसारित करू नका; केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे निर्देश
नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज सर्व दूरदर्शन वाहिन्यांसाठी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. सोशल मिडिया वरून घेतलेले हिंसक व्हिडीओ दूरचित्रवाहिन्यांद्वारे कोणतेही संपादन न करता प्रसिद्ध केले जात आहेत. यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न या परिपत्रकाद्वारे करण्यात आला आहे.
रक्त, मृतदेह व शारीरिक हल्ल्याची छायाचित्रे व व्हिडीओ दाखवणे टिव्ही प्रोग्राम कोडच्या विरुद्ध आहे. तरी देखील दूरचित्रवाहिन्याद्वारे मृतदेह, रक्त, हिंसाचार,अपघात, जखमी व्यक्तींचे फोटो आणि व्हिडीओ दाखवले जातात. याचा लहान मुलांच्या मनावर विपरित परिणाम होतो, त्यामुळे यापुढे असे संवेदनशील, आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ प्रसारित करू नयेत असे मंत्रालयाने सर्व दूरदर्शन वाहिन्यांना कळवले आहे. मंत्रालयाच्या या निर्णयाचे देशातील बालमानसशास्त्रज्ञांकडून स्वागत करण्यात आले आहे, तसेच या परिपत्रकात नमुद केलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.