Home शासकीय कणेरी मठावर पंचमहाभूत महोत्सव; पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

कणेरी मठावर पंचमहाभूत महोत्सव; पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

0 second read
0
0
38

no images were found

कणेरी मठावर पंचमहाभूत महोत्सव; पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या येथील कणेरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान सुमंगल पंचमभूत महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. कोल्हापूरच्या कणेरी मठावर पंचमहाभूत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ३० लाख लोक सहभागी होतील, असा अंदाज आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं असून ते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, या बैठकीनंतर मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज यांनी प्रतिक्रिया दिली. काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले की, २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूरच्या कणेरी मठावर पंचमहाभूत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लाखो लोक या सोहळ्यात सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पर्यावरणाचे संतूलन बिघडलेले आहे. त्यासाठी हा सोहळा घेतला जात आहे. त्याच्या तयारीसाठी आज मंत्रालयात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी ही बैठक बोलावली होती. दुसरीकडे आयोजकांच्या म्हणण्यानुसार, मोदींनी निमंत्रण स्वीकारणे जवळजवळ अंतिम आहे, परंतु औपचारिक घोषणा केली जाणार आहे. या महोत्सवासाठी अनेक मुख्यमंत्री, आठ राज्यांचे राज्यपाल, सुमारे ८०० कुलगुरू आणि साधू संत यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. पृथ्वी, पाणी, हवा, तेज, आकाश अशा पंचमहाभूतांवर आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी हा महोत्सव होईल. परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे या सोहळ्याचे स्वरूप असेल.
महोत्सवात एकूण १ हजार स्टॉल उभारणार असून प्रत्येक राज्यातील कमीत कमी दोनशे पर्यावरणवादी, अभ्यासू लोकांचा सहभाग दोनशे डॉक्टर मिळून आयुर्वेदीक गॅलरी उभारणार व त्याबाबत माहिती देणार. देशी बीजांचे एकत्रित प्रदर्शन भरवणार. पार्किंगच्या ठिकाणी चारचाकी, दुचाकी मेस्त्री, पंक्चर सेवा उपलब्ध महोत्सव व पार्किंगसाठी ५०० एकर जागाअसून एक हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देशभरातील छोट्या अवजारांचे प्रदर्शन. गृहिणी व बेरोजगारांसाठी कुटिरोद्योगांचे प्रदर्शन स्वयंसेवकांसाठी स्वतंत्र ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…