no images were found
दिल्लीत AAPचे बॉबी किन्नर विजयी
दिल्लीमध्ये महापालिका निवडणुकीत भाजपच्या एकता जाटव यांचा पराभव करीत ‘आप’चे बॉबी किन्नर विजयी झाले.
दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मागे टाकत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ पक्षाने बाजी मारल्याचे चित्र दिसून येत आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एकता जाटव यांचा पराभव करीत आपचे बॉबी किन्नर विजयी झाले आहेत. प्रथमच आम आदमी पार्टीने एका ट्रान्सजेंडरला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. जनतेचा विश्वास जिंकून ‘आप’चे बॉबी किन्नर यांनी विजय मिळविला आहे. दिल्लीच्या राजकारणात अशा नाविण्यपूर्ण विजयाची भर पडली आहे.
एखाद्या राजकीय पक्षाने ट्रान्सजेंडर उमेदवार देऊन तो विजयी होण्याची घटना बहुतेक प्रथमत:च घडली असावी. बॉबी हा हिंदू युवा समाज एकता अवाम दहशतवाद विरोधी समितीच्या दिल्ली युनिटचा अध्यक्ष आहे. गेली 15 वर्षे या संस्थेच्या माध्यमातून ते गरजू लोकांना मदत करत आहेत. बॉबी नावाच्या 38 वर्षीय ट्रान्सजेंडरला आम आदमी पार्टीने सुलतानपुरी माजरा विधानसभा मतदारसंघातून सुलतानपुरी-ए प्रभागाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. जनतेने कौल देऊन ‘आप’चे बॉबी किन्नर यांना विजयी केले.