
no images were found
पुणे येथे व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्याने बुक्की मारून जीभ तोडली
पुणे : व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्याने बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी एकाला बेदम मारहाण करत जीभ तोडल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात ही धक्कादायक घटना घडली असून, याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा सगळा प्रकार २८ डिसेंबर रोजी घडला. तक्रारदार दाम्पत्य व आरोपी एकाच सोसायटीत वास्तव्यास आहेत.
सोसायटीतील रहिवाशी असणाऱ्या व्यक्तींचा तक्रारदारांच्या पतीने “ओम हाईट्स ऑपरेशन” या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्यात सर्व सदस्य ही होते. तक्रारदार यांचे पती या ग्रुपचे अॅडमिन होते. दरम्यान, त्यांनी यातील एका व्यक्तीला जो याप्रकरणात आरोपी आहे. त्या ग्रुपमधून रिमूव्ह म्हणजे काढून टाकले.
या गोष्टीचा त्यांनी तक्रारदारांच्या पतीला विचारणा केली. मात्र त्यांना काही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी तक्रारदारांच्या पतीला फोन करून भेटायचे आहे, असे सांगून भेटण्यास बोलावले.त्यावेळी ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मेसेज करत असल्याने ग्रुपच बंद केला असल्याचे सांगितले, असता आरोपीने पाच जणांसोबत येऊन तक्रारदारांना मारहाण केली. त्यांच्या तोंडावर बुक्की मारली, या बुक्कीचा फटका इतका जोरात होता की दातासह जिभेवर त्याचा मार लागला यात ते जखमी झाले असून त्यांच्या जिभेला टाके पडले आहेत.