no images were found
आय. आय. बी. अॅकॅडमीची कोल्हापुरमध्ये नवीन शाखा सुरु
कोल्हापूर : १२ वी नंतर मॅडिकल आणि इंजिनीयरीगला प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोल्हापूर जिल्हयातुन दर वर्षी हजारो विद्यार्थी या अभ्यास क्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षेला म्हणजेच नीट आणि जे.ई.ई. या परीक्षेला बसतात. मात्र त्यासाठी परीपुर्ण प्रशिक्षण देणारी प्रशिक्षण संस्था नसल्याने कोल्हापूर जिल्हयातील अनेक विद्याथ्यीना पुणे, लातुर, औरंगाबाद, नांदेड, या शहरात जाऊन प्रशिक्षण घ्यावे लागत होते. विद्यार्थ्याची ही समस्या सोडवण्यासाठी आय.आय.बी. ॲकॅडमीने कोल्हापूरात आपली शाखा सुरू केली आहे. मॅडिकल आणि इंजिनीयरीगची प्रवेश परीक्षा देऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्याना त्यामुळे सर्वोत्कृष्ठ ॲकॅडमी तर्फे कोल्हापूरातच प्रशिक्षण घेण्याची संधी उपब्लध झाली आहे. अशी माहिती आय. आय.बी. चे संचालक चिंराग सेनमा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर केंद्रावर १ फेब्रुवारी पासून नियमीत क्लासेस सुरू होत असल्याचे आय. आय.बी. ॲकॅडमीची स्थापना २३ वर्षापुर्वी झाली त्यांनी सांगीतले.
नांदेडमध्ये प्राध्यापक गणेश चौगले सर यांनी सन १९९९ साली सुरु केलेल्या या अॅकॅडमीने नीट आणि जे.ई.ई. मध्ये उललेखनीय यश मिळविले त्यानंतर २०१६ साली लातूरमध्ये आय. आय. बी. ची शाखा सुरु झाली. अत्यंत नियोजनपुर्वक बनविलेल्या अभ्यासक्रमामुळे आणि अचूक मार्गदर्शनामुळे लातूर मधून हजारो विद्यार्थी वैद्यकीय परिक्षेत पात्र ठरले. आणि लातूर पॅटर्न महाराष्ट्रासह पुर्ण देशभर प्रसिध्द झाला. त्यानंतर २०२२ मध्ये फेब्रुवारी महिन्यात पुणे येथे शाखा सुरु करण्यात आली. आता २५ डिसेंबर कोल्हापूरात शाहुपुरी ३ री गल्ली येथे राधाकृष्ण मंदिरासमोर शाखा सुरु करण्यात आली आहे. आय. आय.बी. अॅकॅडमीमुळे मुलांचा गुणवत्तास्तर वाढला आहे. नीट बरोबरच जे.ई. ई. परीक्षेच्या मुख्य आणि अॅडव्हॉन्स परिक्षेसाठी विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून अचूक मार्गदर्शन केल्यामुळे आय. आय. टी. चा सक्सेस रेशो ही वाढला आहे. आय. आय.बी. मध्ये प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र आणि तज्ञ शिक्षक तसेच प्रत्येक उपविषयांसाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आय. आय.बी. पॅटर्नचे वैशिष्ट्य असे की, दर रविवारी नीट व जे.ई.ई. पॅटर्नवर आधारित परिक्षा घेतली जाते त्याचप्रमाणे महिन्याच्या शेवटच्या रविवारी पुर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर परिक्षा घेतली जाते त्यानंतर विषयवार मुल्यांकन, सत्रवार मुल्यांकन आणि परिक्षा होण्यापुर्वी अंतिम मुल्यांकन केले जाते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देणे आणि हुशार विद्यार्थ्यांची वेगळी बॅच करून त्यांची गुणवत्ता वाढविण्याकरीता विशेष प्रयत्न केले जातात. लातूर पॅटर्न नंतर आता कोल्हापूर पॅटर्न तयार करून आय.आय.बी. ॲकॅडमी पुर्ण राज्यात कोल्हापूरचा नीट आणि इंजिनिअरींगमध्ये नांवलौकीक करेल असा विश्वास संचालक चिराग सेनमा यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला कोल्हापूरचे बॅच मॅनेजर उत्तरेश्वर खराटे सर यांच्यासह अॅकॅडमी शिक्षक उपस्थित होते.