Home मनोरंजन गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमात तुफ्फान राडा; बॅरेकेटिंग तोडले, खुर्च्या मोडल्या

गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमात तुफ्फान राडा; बॅरेकेटिंग तोडले, खुर्च्या मोडल्या

0 second read
0
0
54

no images were found

गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमात तुफ्फान राडा; बॅरेकेटिंग तोडले, खुर्च्या मोडल्या

सोलापूर: लावणी कलावंत गौतमी पाटील हिच्या सोलापूरमधील नातेपुते गावातील लावणी कार्यक्रमाला इतकी गर्दी झाली की तरुणांनी कार्यक्रमात तुफ्फान राडा घातला. बसायला जागा नव्हती म्हणून खुर्च्या मोडल्या अन् बॅरिकेटिंग तोडून पब्लिक स्टेजपर्यंत घुसली. त्यामुळे पोलिसांना वेळीच हस्तक्षेप करावा लागला.
सोलापूरमधील नातेपुते गावात काल गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला अबाल वृद्धांसह तरुणांची प्रचंड गर्दी झाली होती. या कार्यक्रमात प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या होत्या. पण खुर्च्या कमी आणि गर्दी अधिक अशी अवस्था झाली. बसायला जागाच नसल्याने तरुणांनी खुर्च्या फेकल्या अन् मिळेल तिथे उभं राहुन कार्यक्रमाचा अस्वाद घेण्यास सुरुवात केली. गर्दीला आवर घालण्यासाठी कार्यक्रमस्थळी बॅरिकेटिंग करण्यात आले होते. तरुणांनी बॅरिकेटींग तोडून आत प्रवेश केला. यावरून गर्दी किती होती याचा अंदाज येईल. गौतमीचा कार्यक्रम सुरू असतानाच हा कल्ला सुरू होता.
गौतमीच्या प्रत्येक गाण्यावर, गाण्याच्या ओळींवर आणि तिच्या दिलखेच अदांवर तरुणाई थिरकत होती. कोण फेटे उडवत होतं, कोण टोपी उडवत होतं, कोण शिट्ट्या वाजवत होतं, तर कोणं ठेका धरत नाचत होतं… असा सर्व माहौल गौतमीच्या कार्यक्रमात दिसत होता. मात्र, कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी वेळीच लोकांना सावरण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, गौतमी पाटीलने आपल्या कार्यक्रमाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सबसे कातील गौतमी पाटील या ट्रेंड मुळे खूप आंनद होतो. लोक माझ्यावर प्रेम करत आहेत, माझा सन्मान करत आहेत. आज बीडमध्ये दुसरा कार्यक्रम होता. नियोजन चांगले होते म्हणून कार्यक्रम छान झाला, असं गौतमी म्हणाली.
१ तारखेला माझी नवीन लावणी येतेय. महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी मी नवीन लावणी घेऊन येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक सेलने गौतमी पाटीलला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे मराठवाडा संघटक नितीन मुजमुले यांनी तिला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून गौतमीला विरोध होत आहे, असा आरोप आयोजक सचिन लोखंडे यांनी केलाय.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …