no images were found
आयसीआयसीआय प्रु गॅरंटीड पेन्शन योजनेला ‘प्रॉडक्ट ऑफ द इयर २०२१’ हा सन्मान
निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळवण्याची ग्राहकांची गरज पूर्ण करण्यासाठी कंपनीने आयसीआयसीआय प्रु गॅरंटीड पेन्शन प्लॅन हे अनोखे अॅन्युईटी उत्पादन लाँच केले आहे, ज्यावर आयुष्यभर खात्रीशीर निवृत्तीवेतन ते उत्पादन खरेदी करते वेळेस निश्चित करण्यात आलेल्या व्याजदरात मिळते. निश्चित उत्पन्नाशी संबंधित इतर साधनांवरील व्याजदरात येणाऱ्या अस्थिरतेचा निवृत्तीवेतनाच्या रकमेवर परिणाम होत नाही. जॉइंट लाइफ पर्यायाची निवड करून ग्राहकांना त्यांच्या पश्चात आपल्या जोडीदाराला खात्रीशीर उत्पन्न मिळेल व आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहाता येईल याची सोय करणे शक्य आहे. आयसीआयसीआय प्रु गॅरंटीड पेन्शन प्लॅनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. या उत्पादनाला प्रॉडक्ट ऑफ द इयर (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या जगातील सर्वात मोठ्या ग्राहक- मतदानावर आधारित अनोख्या उत्पादनांना दिला जाणारा ‘प्रॉडक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला आहे.