no images were found
अपघात टाळण्यासाठी समृद्धी महामार्गावर १ जानेवारीपासून स्पीड गन बसवणार
नागपूर : समृद्धी महामार्गावर १ जानेवारीपासून स्पीड गन बसवण्यात येणार आहे. नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या टप्प्याचं ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि हा महामार्ग सुरू करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या १८ दिवसांत विविध भागात किमान ४० अपघात झाले. त्यात ७ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, परिवहन विभागाने स्पीड गन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांनसाठी वेगमर्यादा प्रतितास १२० किमी असा नियम काढण्यात आला आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी आज प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर येथे समृद्धीवरील अपघातांना आळा घालण्यासाठी उपाययोजनांवर विचार करण्यासाठी बैठक बोलावली होती.या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.