no images were found
अतिक्रमण विभागाकडून बेवारस वाहनांवर कारवाई
कोल्हापूर : मा. प्रशासक बलकवडे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या आदेशानुसार शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार दिनांक 28/12/2022 रोजी शहर वाहतूक नियंत्रण शाखा व कोल्हापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून बेवारस वाहनांवर कारवाई करणेत आली. राजारामपुरी येथून 2 तर जुना बुधवार भगतसिंग तरुण मंडळ तेथून 2 अशी एकूण 4 वाहने जप्त करणेत आली. तसेच राजारामपुरी, शाहूपुरी, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बागल चौक येथे नोटीस लावण्यात आलेल्या 18 गाड्या स्वतः वाहन मालकांनी काढून घेतल्या आहेत तर राहिलेल्या बेवारस व वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून जप्त करण्यात येणार आहेत. सदर कारवाई चालूच राहणार आहे. सदर कारवाई ही शहर वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी मॅडम, सचिन जाधव अतिक्रमण अधीक्षक, सजन नागलोत कनिष्ठ लिपिक, मुकादम रविंद्र कांबळे, अतिक्रमण पथक कर्मचारी यांचे सहकार्याने पार पाडण्यात आली.