Home राजकीय माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर जेलबाहेर, स्वागतासाठी अजित दादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची उपस्थिती

माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर जेलबाहेर, स्वागतासाठी अजित दादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची उपस्थिती

0 second read
0
0
259

no images were found

माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर जेलबाहेर, स्वागतासाठी अजित दादा, सुप्रिया सुळे, जयंत पाटलांची उपस्थिती

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर आज जामीनावर सुटका झाली आहे. आर्थर रोड तुरुंगातून ते बाहेर आले. देशमुख यांचा जामीन रद्द करण्याची सीबीआयची मागणी हाय कोर्टाने फेटाळल्यानंतर आज बुधवारी अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आले. १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणात नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. आज सुमारे १४ महिन्यांनी कोठडीनंतर ते बाहेर आले आहेत.
अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी जेलबाहेर हजेरी लावली. अनिल देशमुख यांची सुटका होणार, या बातमीनंतर आर्थर रोड तुरुंगाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली. आर्थर रोडबाहेर टायगर इज बॅक, हौसला बुलंद रहे, अशा आशयाचे बॅनर घेतलेल्या कार्यकर्त्यांची जेलबाहेर प्रचंड गर्दी जमा झाली आहे.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करून सत्तारुढ केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातलं मविआ सरकारचं अडचणीत आणण्यासाठी अनेक कारवाया झाल्या. त्यापैकी या दोन कारवाया आहेत. न्यायदेवतेने आज न्याय केल्याचं आजचं चित्र आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातलं ईडी सरकार विरोधात काही करत असेल तर त्याला आधी एजन्सीची भीती दाखवायची.. भुजबळ, राऊत आता देशमुखांचीही केस आपण पाहिली. सव्वा वर्ष अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकलेलं आहे. अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांनी काय झेललंय, हे मी खूप जवळून पाहिल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.अनिल देशमुखांविरोधात ईडीने १०९ वेळा धाड टाकली. पण एकही वेळा काहीही हाती आलं नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. हा जागतिक विक्रम असल्याचंही त्यांनी ठासून सांगितले आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…