Home क्राईम पत्नी माहेरी निघून गेल्याने नैराश्यातून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

पत्नी माहेरी निघून गेल्याने नैराश्यातून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

0 second read
0
0
40

no images were found

पत्नी माहेरी निघून गेल्याने नैराश्यातून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

जयपूर: पत्नी माहेरी गेल्याने नाराज पतीने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. गोळी लागल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून कुटुंबीयांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी हायर सेंटरला पाठविण्यात आले. रामजीलाल असे गोळी लागल्याने जखमी झाल्याचे नाव आहे. राजस्थानच्या बारीपुरा गावात ही घटना घडली आहे.
एसएचओ सिंह यांनी सांगितले की, तरुणाच्या कुटुंबीयांशी या घटनेबाबत चर्चा केली असता, गजराज या तरुणाचे एक वर्षापूर्वी लग्न झाल्याचे समजले. तरुणाला अंमली पदार्थांचे व्यसन लागल्याने त्याची पत्नी दोन महिन्यांपूर्वी माहेरी गेली. पत्नी माहेरी गेल्याने संतापलेल्या तरुणाने स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यानंतर पोलिसांनी गावात पोहोचून घटनास्थळावरून अवैध देशी कट्टा जप्त केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…