Home स्पोर्ट्स 48 व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी धक्कादायक निकालांची नोंद

48 व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी धक्कादायक निकालांची नोंद

2 second read
0
0
211

no images were found

48 व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी धक्कादायक निकालांची नोंद

पहिल्या चार पटावर डाव बरोबरीत  राखण्यात नवोदित खेळाडूंना यश : अग्रमानांकित खेळाडूंना स्पर्धेच्या सुरुवातीलाच धक्का

कोल्हापूर : संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे 26 डिसेंबर पासून सुरु असलेल्या 48 व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेतील तिसरी फेरी  संपन्न झाली. सदर फेरीत पहिल्या चार बोर्डवर युवा खेळाडूंनी स्पर्धेतील अग्रमानांकित खेळाडूंना बरोबर राखले. याच सोबत ऋचा पुजारी , स्वाती घाटे आणि श्रीजा शेषाद्री ह्या अग्रमानांकित खेळाडूंना महाराष्ट्राच्या आशना माखिजा, साक्षी चितलांगे आणि वृषाली देवधर यांनी पराभवाचे धक्के देत स्पर्धेतील तिसऱ्याच फेरीत धक्कादायक निकालांची नोंद केली.

पहिल्या बोर्डवर पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना आंध्र प्रदेशच्या बोमिनी मोनिका ने अग्रमानांकित वंतिका अग्रवाल ला क्लोस्ड सिसिलिअन पद्धतीच्या फियांचेतो व्हेरिएशन मध्ये पकडत 35 व्या चालिला डाव बरोबरीत सोडवला तर महाराष्ट्राच्या विश्वा शाह हिने गतविजेत्या दिव्या देशमुखला सिसिलिअन पद्धतीच्या कॅनाल अटॅक ह्या व्हेरिएशन चा वापर करत 87 चाली पर्यंत दीर्घकाळ चाललेल्या लढतीत अथक परिश्रमाने डाव बरोबरीत रोखण्यात यश मिळवले.

केरळच्या निम्मी जॉर्ज ने पेट्रोलियम बोर्डाच्या मेरी आना गोम्सला इंग्लिश ओपनिंग मधील टायमानोव्ह पद्धतीचा अचूक वापर करत एकसष्ठाव्या चालिला बरोबरी साधली तर महाराष्ट्राच्या ऋतुजा बक्षी हिने अर्जुन पुरस्कार विजेती गोव्याची भक्ती कुलकर्णी हिला बरोबरीत रोखत सर्वांची वाहवा मिळवली. ह्या स्पर्धेचे अजून आठ फेऱ्या बाकी असून महाराष्ट्राच्या साक्षी चितलांगे, आशना माखिजा आणि वृषाली देवधर , पश्चिम बंगालची ब्रिस्ती मुखर्जी ह्या 3 गुणांसह स्पर्धेत अग्रेसर आहेत तर त्यांच्या पाठोपाठ 20 खेळाडू 2.5 गुणांसह स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहेत.

ह्या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून कर्नाटकचे आंतरराष्ट्रीय पंच मंजुनाथ एम काम पाहत असून त्यांना सहाय्यक पंच म्हनुन विनिता श्रोत्री, भास्कर व्ही., अथर्व गोडबोले, मोहित लाडे , पौर्णिमा उपळावीकर, सुमुख गायकवाड आणि नीरज कुमार मिश्रा हे  काम करत आहेत. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी,संजय घोडावत युनिव्हर्सिटीचेे विश्वस्त विनायक भोसले,प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील,प्राचार्य विराट गिरी,अमित कोडक,तुषार,स्वप्निल अकोळे यांच्यासह महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, मनीष मारुलकर, धीरज वैद्य,आरती मोदी,महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार विलास म्हात्रे, विवेक सोहनी,रोहित पोळ,प्रशांत पिसे, आदित्य आळतेकर,अमित मोदी,करण परीट मेहनत घेत आहेत.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …