Home सामाजिक टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलच्या प्रोजेक्ट विस्तारमुळे कोल्हापूरातील छोट्या व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी

टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलच्या प्रोजेक्ट विस्तारमुळे कोल्हापूरातील छोट्या व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी

0 second read
0
0
231

no images were found

टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलच्या प्रोजेक्ट विस्तारमुळे कोल्हापूरातील छोट्या व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी

संपूर्ण महाराष्ट्रात तालुका पातळीवर वाढविणार डीलर्स

कोल्हापूर : टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने आज आपल्या अनोख्या उपक्रमाची – प्रोजेक्ट विस्तारची घोषणा आज कोल्हापूर येथे करण्यात आली भारतातील कानाकोपऱ्यात रंगीत पत्र्यांची सर्वोत्तम उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करून देणे या उद्देशाने ही संकल्पना टाटा ब्लूस्कोप स्टीलकडून राबविण्यात येत आहे. सध्या टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे संपूर्ण भारतात ६००० पेक्षा जास्त वितरक आहेत . या वितरकांद्वारे ‘ड्यूराशाईन’ या ब्रँड नावाने कलर कोटेड स्टीलची छते आणि इतर उत्पादने उपलब्ध आहेत. प्रोजेक्ट विस्तारमुळे सामान्य, होतकरू व्यक्ती माफक भांडवलामध्ये टाटा ब्लूस्कोप स्टीलची डीलर होऊ शकते. टाटा ब्लूस्कोप स्टीलचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कृपया ८९५६० ४०९४२ या क्रमांकावर सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क करावा.
टाटा ब्ल्यूस्कोप स्टील महाराष्ट्रात ‘प्रोजेक्ट विस्तार’ ही नवी संकल्पना घेवून आले आहेत. या उपक्रमाविषयी माहिती देताना नंदकिशोर परमार (हेड – डीलर मॅनेजमेंट, चॅनेल सेल, टाटा ब्लूस्कोप स्टील) म्हणाले की , आज भारताची अर्थव्यवस्था खूप वेगाने वाढत आहे. ह्या वाढीचा दर २०२२ च्या आर्थिक वर्षात ७ टक्के अपेक्षित असून भारताच्या जीडीपी वाढीमध्ये महाराष्ट्र राज्याचा सर्वात मोठा वाटा आहे. भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील टियर २ आणि ३ शहरांमध्ये मोठी बाजारपेठ आहे. राज्यातील ३५० हून अधिक तालुक्यांमध्ये मध्यम आणि लघुउद्योगांचा विकास अपेक्षित असून त्या बरोबरच पूरक गृहनिर्माण / रिअल इस्टेट उद्योग, शाळा, कॉलेजेस, गोडाउन, मॉल्स, रिसॉर्ट्स, ह्याची भरभराट होऊ शकते.

ते पुढे म्हणाले की, टियर ३ म्हणजे छोट्या शहरांमध्ये शेतीवर आधारित व्यवसाय जसे की कुकुटपालन, दुग्धजन्य पदार्थ, पशुपालन/ गोशाळा, कांदाचाळ, धान्य कोठारे, शीतगृह केंद्रे, अन्नप्रक्रिया ऊद्योग, च्या उभारणीसाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण तथा तालुका, तहसील, व दुर्गम भागात इंटरनॅशनल टेक्नॉलॉजीने बनलेली नावीन्यपूर्ण, दर्जेदार, टिकाऊ व आकर्षक छते, अथवा पत्रे योग्य किमतीला उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. ग्रीन एनर्जी, ग्रीन प्रॉडक्ट्स, एनर्जी कॉन्सर्वेशन, वॉटर हार्वेस्टिंग ही आव्हाने ध्यानी ठेऊन टाटा ब्लूस्कोप कंपनी वितरकांच्या माध्यमातून आपल्या अजोड आणि अमूल्य उत्पादनांची विक्री व सेवा सक्षम करण्यासाठी एक मजबूत शृंखला विकसित करत आहे. आमचा मुख्य उद्देश ग्रामीण स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि प्रदेशाच्या विकासाला चालना देणे हा राहील. तरूण, जिद्दी, महत्वाकांक्षी युवक अथवा व्यापारी यांना आवाहन करत आहे की त्यांनी आपल्या चालू व्यवसायात टाटा ब्रँड समाविष्ट केला तर नक्कीच त्यांची उन्नती अधिक चांगल्या प्रकारे होईल, बाजारात पत वाढेल आणि चौफेर प्रगती साधता येईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…