Home राजकीय बाळासाहेबांच्या शिवसेनेचा २४ डिसेंबरला मेळावा

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा २४ डिसेंबरला मेळावा

0 second read
0
0
112

no images were found

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा २४ डिसेंबरला मेळावा

कोल्हापूर : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेने घवघवीत यश संपादन केले यासह राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा व शहरात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने बाळासाहेबांच्या शिवसेनेने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. शहरासह जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकत दिसून येत असून, ही ताकत अधिक मजबूत करण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाणार आहे. संघनातमक बांधणीच्या दृष्टीने गेल्या दोन महिन्यात शहरात विविध प्रमुख पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, याचा पुढील टप्पा म्हणून “प्रभाग तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक” या माध्यमातून शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शाखांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. या मेळाव्यास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर साहेब शिवसैनिकांनी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या मेळाव्यास शहरातील उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, युवा सेना, महिला आघाडी सह सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ही करण्यात आले आहे. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…