no images were found
जिल्हा नियोजन समितीवर भाजप समर्थकांची वर्णी; शनिवारी बैठक
कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीवर अठरा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नियोजन विभागाने सदस्यांच्या नावांची घोषणा केली आहे. जिल्हा नियोजनाचा अनुभव, तज्ञ व विशेष निमंत्रित म्हणून या सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची शनिवार दि. २४ डिसेंबर रोजी बैठक होत आहे.
नियोजन समितीच्या बैठकीच्या एक दिवस अगोदर सदस्यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त सदस्यांमध्ये बहुतांश भाजप समर्थक आहेत. शिवाय माजी आमदार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांचा समावेश आहे. नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये माजी मंत्री भरमू अण्णा पाटील, माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, प्रतापराव अण्णासाहेब देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसाद बाळकू खोबरे, राहुल देसाई, अशोकराव कोंडीराम माने, माजी नगरसेवक सत्यजित कदम, अमित गजानन कामत, सत्यजीत बाळासाहेब पाटील, शिवाजी सुभाष चौगुले, चंद्रकांत लक्ष्मणराव मोरे, यशवंत केरबा नांदेकर, अशोक काशीनाथ, दशरथ गणपती काळे, संजय शिवाजीराव पोवार, अंकुश रामचंद्र निपाणीकर, माणगावचे सरपंच डॉ.राजू उर्फ अभयकुमार आप्पासाहेब मगदूम यांचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन अठरा सदस्यांमध्ये खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या समर्थकांचा समावेश आहे.