Home शासकीय पथविक्रेता समितीच्या दोन जागांसाठी दिलीप पवार व किरण गवळी यांची निवड

पथविक्रेता समितीच्या दोन जागांसाठी दिलीप पवार व किरण गवळी यांची निवड

2 second read
0
0
15

no images were found

पथविक्रेता समितीच्या दोन जागांसाठी दिलीप पवार व किरण गवळी यांची निवड

कोल्हापूर  : कोल्हापूर शहरामध्ये पथविक्रेता समितीच्या सर्वसाधारण गटामधील दोन जागांसाठी दिलीप पवार, किरण गवळी यांची निवड झाली आहे. यामध्ये दिलीप पवार  यांना 1655 तर किरण गवळी यांना 1513 मते मिळाली. तर दत्ता रामचंद्र चौगुले यांना 61 व इंद्रजीत कृष्णात शेट्टी यांना 586 मते मिळाली. या निवडणूकीसाठी 5630 मतदानापैकी 2140 मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये नाटासाठी 11 व बाद मते 24 पडली आहेत. उमेदवारांच्या माघारीनंतर पाच जागांसाठी एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने या जागांवर यापुर्वीच 5 जागांसाठी बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये अनु:जाती महिला मधून सरोज राजेंद्र कांबळे, अल्पसंख्याक महिला मधून मुमताज अब्दुल बागवान, इतर मागास प्रवर्ग मधून नंदकुमार आनंदराव वळंजू, सर्वसाधारण महिला मधून शेवताबाई वसंतराव जाधव, दिव्यांग मधून अमर रहंदोमल छत्री यांची बिनविरोध निवड झाली आहे. हि निवडणूक व मतमोजणी प्रक्रिया प्रशासक के.मंजूलक्ष्मी, निवडणूक निर्णय अधिकारी उप-आयुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यासाठी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय पाटील, नोडल ऑफिसर विलास साळुंखे, सुधाकर चल्लावाड, एनयुएलएमचे व्यवस्थापक रोहित सोनुले, विजय तळेकर, विजय वणकुद्रे यांनी कामकाज पाहिले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…