
no images were found
समाज माध्यम दुधारी शस्त्र : करेकट्टी विद्यापीठात यूट्यूब संदर्भात कार्यशाळा उत्साहात
कोल्हापूर : समाज माध्यम हे दुधारी शस्त्र असून यूट्यूबरने आपला विवेक जागृत ठेवून अर्थार्जन करावे. असे प्रतिपादन हिंदी विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागाच्यावतीने ‘यूट्यूब चॅनल : निर्माण, उपयोग, रोजगार’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा समापन सत्रात त्या बोलत होत्या.
पीएम उषा योजनेअंतर्गत आयोजित या कार्यशाळेत 190 विद्यार्थी व संशोधकांनी सहभाग नोंदविला. डॉ करेकट्टी यांनी कार्यशाळेतील उपस्थिती पाहता आणखी व्यापक स्तरावर कार्यशाळा आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.
दूस-या दिवसाच्या पहिल्या सत्रात समाज माध्यम तज्ज्ञ डॉ. आलोक जत्राटकर यांनी चांगल्या यूट्यूबर बनण्यासाठी कंटेंट, क्रिएटिव्हीटी, कन्सिस्टंसी सोबत प्रगल्भ व विवेकवादी समाज निर्मितीसाठी काँसिएन्स (विवेक) ही चौथी बाब अतिशय महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले. जत्राटकर यांनी संवाद साधनांच्या महत्त्वाविषयी व्यापक माहिती दिली. दुस-या सत्रात डॉ. सुषमा चौगले यांनी व्हिडीओ क्वालिटी व एडिटिंगबाबत प्रात्यक्षिक दाखविले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश मुंज यांनी केले. कार्यशाळेचे संयोजक डॉ. अक्षय भोसले, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. गीता दोडमणी, प्रा. अनिल मकर यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते