Home शासकीय शेतकऱ्यांनी प्रक्षेत्र भेटीसाठी कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क करावा

शेतकऱ्यांनी प्रक्षेत्र भेटीसाठी कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क करावा

17 second read
0
0
31

no images were found

शेतकऱ्यांनी प्रक्षेत्र भेटीसाठी कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क करावा

कोल्हापूर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष शेतावरील प्रक्षेत्र प्रशिक्षणासाठी पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली  जिल्ह्यामधील प्रगतशील शेतक-यांच्या शेतावर तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत संशोधन संस्था,अद्यावत कृषि विज्ञान केंद्र तसेच कृषि विद्यापीठे व फलोत्पादन पिकाबाबत कार्यरत संशोधन संस्थाना प्रक्षेत्र भेटी देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकरी तसेच बस मालक सेवा पुरवठादार यांनी संबधित तालुका कृषि अधिकारी तसेच उपविभागीय कृषि अधिकारी कोल्हापूर, करवीर व गडहिंग्लज या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

 प्रक्षेत्र भेटीचा संभाव्य कालावधी जानेवारी 2023 च्या दुस-या पंधरवड्यात आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यातंर्गत शेतकरी प्रशिक्षण  या बाबीसाठी  खर्चाच्या मापदंडानुसार प्रती शेतकरी प्रती दिन 1 हजार रुपये या प्रमाणे जास्तीत-जास्त 5 दिवसाच्या  प्रशिक्षणासाठी  अर्थसहाय्य देय आहे. जिल्ह्याकरिता प्राप्त लक्षांकानुसार उपविभाग निहाय प्रती उपविभाग 50 या प्रमाणे  150 शेतक-यांची निवड केली जाणार असून पाच दिवसासाठी दररोज सकाळी चहा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा व रात्रीचे जेवण व चार दिवसांची राहण्याची सोय करण्यात येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…