Home आरोग्य बॉलीवूड फॅशनिस्टा अनन्या पांडे यांच्याकडून ‘फॅशन अँड ग्लो अप’ अनुभव फक्त एअरबीएनबी वर

बॉलीवूड फॅशनिस्टा अनन्या पांडे यांच्याकडून ‘फॅशन अँड ग्लो अप’ अनुभव फक्त एअरबीएनबी वर

1 second read
0
0
162

no images were found

बॉलीवूड फॅशनिस्टा अनन्या पांडे यांच्याकडून ‘फॅशन अँड ग्लो अप’ अनुभव फक्त एअरबीएनबी वर

कोल्हापूर,  : बॉलीवूड फॅशन आयकॉन अनन्या पांडे एक खास, अद्वितीय फॅशन आणि ग्लो अप अनुभव “अनन्याज स्टाईल एडिट”, फक्त एअरबीएनबीवर आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. फॅशनप्रेमी, ग्लॅमरचा शोध घेणाऱ्या आणि अनन्याच्या चाहत्यांना त्यांच्या सिग्नेचर स्टाइल विश्वात प्रवेश देण्यासाठी डिझाइन केलेला हा अनुभव जास्तीत जास्त चार पाहुण्यांना उपलब्ध असेल.

हा ४ तासांचा अनुभव फक्त शून्य रूपये किमतीत उपलब्ध आहे. या अनुभवात जास्तीत जास्त ४ पाहुणे सहभागी होऊ शकतात. १ किंवा २ लोकांसाठी बुक करा. परंतु जागा मर्यादित असल्यास फक्त एकाच व्यक्तीचे बुकिंग होईल.पाहुण्यांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी या तत्वावर असेल. नवी दिल्ली येथे जाणे आणि येण्याचा खर्च पाहुण्यांना करावा लागेल. या ४ तासांच्या अनुभवात फॅशन रिबूट, स्ले अँड स्प्रे, पोज अँड शाइन, कॉफी विथ अनन्या आणि स्ले दि डे भेटवस्तू या गोष्टी समाविष्ट असतील

दिल्लीतील सर्वात आकर्षक एअरबीएनबीपैकी एक असलेल्या अनन्याच्या स्वप्नातील क्लोसेट आणि व्हॅनिटी स्पेसच्या स्वप्नातीतल आवृत्तीत राहण्याची संधी चाहत्यांना मिळेल. तिच्या वॉक-इन वॉर्डरोबपासून ते व्हॅनिटी झोनपर्यंत ही जागा पूर्णपणे धमाल फॅशन प्लेग्राउंडमध्ये रूपांतरित झाली आहे.

सूत्रसंचालक अनन्या पांडे म्हणाल्या, की मी एअरबीएनबी ओरिजिनल्सने तयार करून आयोजित केलेल्या “अनन्याज स्टाईल एडिट” द्वारे माझ्या ग्लिट्झ आणि ग्लॅमच्या जगात पाहुण्यांचे स्वागत करण्यास खूप उत्सुक आहे. फॅशन आणि अभिव्यक्ती हे एक अभिनेत्री म्हणून माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक मोठा भाग आहेत आणि माझ्या चाहत्यांना पर्सनल, प्रत्यक्ष पद्धतीने त्याची ओळख करून देणे ही खास गोष्ट आहे. या सुंदर अनुभवात पाहुण्यांना भेटण्यासाठी, गप्पागोष्टी करण्यासाठी आणि एकत्र अविस्मरणीय आठवणी निर्माण करण्यासाठी मी उत्सुक आहे

एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियाचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत बजाज म्हणाले की. अनन्याची स्टाइल आणि बॉलिवूडप्रेमी देशातील तरुण प्रेक्षकांशी असलेले मजबूत कनेक्शन या सहकार्याला खरोखर खास बनवते. आम्हाला चाहत्यांना तिचे ग्लॅमरस जग जवळून अनुभवण्याची संधी देताना अभिमान वाटतो. त्यातून तिच्याशी जिव्हाळ्याचे, स्नेहमीय आणि अविस्मरणीय नाते तयार होईल

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…