
no images were found
पारितोषिक-प्राप्त चव, खिशात मावणारं परफेक्शन. ‘द ग्लेनवॉक’ महाराष्ट्रात लॉन्च
मुंबई, – प्रतिष्ठित आयडब्ल्यूएस अवॉर्डस् 2024 ची सुवर्णपदक मानकरी कार्टेल बदर्स/ब्रोजची प्रमुख स्कॉच , द ग्लेनवॉक’ने सध्या महाराष्ट्रात वादळ निर्माण केलं आहे. अतिशय स्टायलिश स्वरुपात 200 मिली निप बाटलीत उपलब्ध असलेली ग्लेनवॉक लाट निर्माण करण्यासाठी आणि व्हिस्कीचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहे!
आकर्षक ₹500 च्या किंमतीत उपलब्ध असलेली निप बाटली आपल्या ग्राहकांना सुलभ आणि किफायतशीर पद्धतीने द ग्लेनवॉक’ची हटके गुणवत्ता आणि स्वाद देण्याकरिता सज्ज आहे. सध्या महाराष्ट्र, द ग्लेनवॉक’च्या एकंदर विक्रीत 68%चे भरीव योगदान देते आहे. ब्रॅंडकरिता हे एक प्रमुख राज्य ठरले असून 200 मिलीची निप बॉटल बाजारात दाखल करण्यात आली. द ग्लेनवॉकचे लक्ष्य या प्रदेशातील विक्री चौपट वाढविण्याचे आहे. हे धोरणात्मक पाऊल केवळ लक्षणीय वाढीस चालना देणारे नाही तर व्यापक प्रमाणात खरेदीदारांना लक्षणीयरित्या आकर्षित करताना दिसेल. उत्पादनाचे स्थान बाजारपेठेत मजबूत करेल.
जून 2023 मध्ये सुरुवात झाल्यापासून, ग्लेनवॉकने अभूतपूर्व यश मिळविण्यासाठी सह-संस्थापक मोक्ष सानी, जितिन मेरानी, रोहन निहलानी, मनीष सानी आणि चीफ बिझनेस ऑफिसर नीरज सिंग यांच्या नेतृत्वाखालील कार्टेल बदर्स/ब्रोजच्या कौशल्याचा लाभ घेतला आहे. यामध्ये प्रोवाइन 2023 मधील सुवर्णपदक, 2024 च्या लंडन स्पिरिट्स स्पर्धेतील रौप्यपदक आणि आयडब्ल्यूएससी 2024 मधील रौप्यपदक यासह प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील पुरस्कार समाविष्ट आहेत. हे पुरस्कार द ग्लेनवॉकची अपवादात्मक गुणवत्ता आणि चव अधोरेखित करतात. ज्यामुळे हा ब्रँड चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीला उतरला आहे.
लिव्हिंग लिक्विडझ्, मॅन्शनझचे संस्थापक आणि कार्टेल बदर्स/ब्रोजचे सह-संस्थापक मोक्ष सानी म्हणाले, “महाराष्ट्रातील समजदार ग्राहकांसाठी 200 मिली निप बाटली सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. कार्टेल बदर्स/ब्रोजच्या कौशल्याच्या पाठिंब्याने हे लॉन्च्, नाविन्यपूर्णतेप्रती आमची बांधिलकी आणि प्रीमियम स्पिरिट अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या समर्पणाचा पुरावा आहे. आम्हाला विश्वास वाटतो की हे नवीन स्वरूप आमच्या विद्यमान ग्राहकांशी सुसंगत असेल आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करेल “.
प्रसिद्ध अभिनेता आणि द ग्लेनवॉक’चा ब्रँड अॅम्बेसेडर संजय दत्त पुढे म्हणतोः “ग्लेनवॉक 200 मिली निप हा गेम चेंजर ठरेल. ही बाटली सोयीस्कर आणि परवडणाऱ्या पॅकेजमध्ये द ग्लेनवॉकची उत्कृष्ट चव उपलब्ध करून देते. तुम्ही एकट्याने संध्याकाळी मजा करण्याच्या मूडमध्ये असाल किंवा मित्रांसोबत वेळ घालविण्याच्या तयारीत असल्यास ही निप त्या अनुभवाचा आस्वाद घेण्याचा योग्य मार्ग आहे “.
ग्लेनवॉक’ची 200 मिली निप बाटलीचे लॉन्च् हे भारतातील आघाडीचा प्रीमियम स्कॉच व्हिस्की ब्रँड म्हणून आपले स्थान आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल आहे. तिची अपवादात्मक चव, परवडणारी किंमत आणि सोयीस्कर पॅकेजिंगसह, द ग्लेनवॉक व्यापक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्याचा यशाचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी सज्ज आहे.
द ग्लेनवॉकविषयी: कार्टेल बदर्स/ब्रोजने स्थापन केलेली आणि मालकीची ग्लेनवॉक स्कॉच व्हिस्की ही तीन वर्षे जुन्या सर्वोत्तम स्कॉच माल्ट्स आणि धान्यांसह तयार करण्यात आलेलं एक उत्कृष्ट मिश्रण आहे. संजय दत्त हा ‘द ग्लेनवॉक’ चा सेलिब्रिटी ब्रँड अॅम्बेसेडर आहे. जगातील पहिल्या 3 उत्पादकांपैकी एकाने स्कॉटलंडमध्ये तयार केलेलं, द ग्लेनवॉक आकर्षक किंमतीत अपवादात्मक गुणवत्ता प्रदान करते. त्याची सुरुवात झाल्यापासून वर्षभराच्या आत, ग्लेनवॉकने 30 हून अधिक वितरण भागीदारांसह भागीदारी करून भारतातील सहा राज्यांत कार्यरत आहे. कोणत्याही नवीन अल्कोबेव्ह स्टार्टअपसाठी हा एक दुर्मीळ पराक्रम मानला जातो.