no images were found
वचन व निष्ठेच्या पारंपारिकरित्या बदलत्या संकल्पनांना आव्हानात्मक कथा ‘ए चीट डे’
रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सने आज त्यांचा नवीन लघुपट ‘ए चीट डे’ प्रदर्शित केला. या लघुपटामध्ये ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’मधून प्रसिद्धी मिळालेला अभिनेजा राजीव सिद्धार्थ आणि ‘नीरजा’मधून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री ईशा ए चोप्रा प्रमुख भूमिकेत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये समीक्षकांनी प्रशंसित केलेले दिग्दर्शक गौतम अरोरा यांचे दिग्दर्शन असलेला हा लघुपट दोन अनोळखी व्यक्ती माया व चिराग यांच्यामधील संवादाच्या अवतीभोवती फिरतो. हे दोघे एका बारमध्ये एकमेकांना भेटतात. या भेटीदरम्यान वचन व निष्ठेप्रती या दोन व्यक्तींच्या विभिन्न पैलूंना आणि त्यामध्ये सामावलेल्या बाबींना दाखवले जाते.
वचनाचे विकसित स्वरूप आणि नात्यामध्ये काय ठीक आहे, काय ठीक नाही याबाबत आधुनिक जोडप्याच्या मतावरील लक्षवेधक कथानक असलेला हा लघुपट माया व चिराग यांच्यामधील संवादावर, तसेच ते या अपरंपरागत निवडीच्या दोन्ही बाजूंमध्ये कशापकारे गुरफटून गेले आहेत याबाबतच्या त्यांच्या मतांवर लक्ष केंद्रित करतो. त्यांच्यामधील धमाल, नखरेबाज व विनोदाने भरलेला संवाद कथानकामधील मूळ संदर्भाला आणि नात्यामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या वचनाच्या नवीन पैूलंना सादर करतो. माया व चिराग यांच्यामध्ये जवळीक निर्माण होत असल्याचे वाटत असतानाचा या लघुपटाचा आंबट-गोड शेवट प्रेक्षकांना अचंबित करेल, ज्यामध्ये अनेक भावना सामावलेल्या आहेत.
हा लघुपट प्रथम रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्टच्या लार्ज शॉर्ट फिल्म्स यूट्यूब चॅनेलवर दाखवण्यात येईल. हे चॅनेल भारतातील सर्वोत्तम दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले ओरिजिनल व प्रेरणादायी लघुपट पाहण्याचा आनंद देणारे व्यासपीठ आहे.