Home देश-विदेश आयफोन- १४ मुळे ३०० फूट दरीत कारसह कोसळलेल्या दाम्पत्याला मिळाले जीवादान

आयफोन- १४ मुळे ३०० फूट दरीत कारसह कोसळलेल्या दाम्पत्याला मिळाले जीवादान

1 second read
0
0
208

no images were found

आयफोन- १४ मुळे ३०० फूट दरीत कारसह कोसळलेल्या दाम्पत्याला मिळाले जीवादान

कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया एंजेल्स फॉरेस्ट हायवेवर प्रवास करताना कारचा ताबा सुटल्याने एका दाम्पत्याची कार तीनशे फूट दरीत कोसळली. या ठिकाणी कोणतेही फोन नेटवर्क काम करीत नव्हते. त्यावेळी आयफोन – १४ चे क्रॅश डिटेक्शन फिचर त्यांच्या कामी आले. आयफोनच्या या फंक्शनमुळे ३०० फूट दरीतून त्यांचा उर्वरित जगाशी संपर्क झाला,
ज्यावेळी सेल्यूलर फोनचे नेटकर्क कामी येत नाही, त्यावेळी आयफोन – १४ चे क्रॅश डिटेक्शन फिचरमधील सॅटेलाईट नेटवर्कचा वापर करता येतो. या सॅटेलाईट नेटवर्कचा वापर करून त्यांनी आपल्या ठावठिकाण्याचा एक टेक्स मॅसेज तयार करीत मदतीची याचना केली. हा संदेश त्यांनी एप्पलच्या रिले सेंटरला पाठविला. त्यानंतर सूत्रे हलली. एप्पलच्या रिले सेंटरच्या कर्मचाऱ्याने तातडीने हा संदेश लॉस एजिल्स कंट्री शेरीफच्या कार्यालयाला पाठवित मदतीची मागणी केली. लागलीच सर्च अँड रेस्क्यू टीमला एक दाम्पत्य तीनेशे फूट दरीत कोसळल्याचे लोकेशन देण्यात आले.
हॅलिकॉप्टरसह ही टीम घटनास्थळी रवाना झाली. या टीम दुर्घटनाग्रस्त कारच्या जखमी दाम्पत्याला शोधून काढीत त्यांना रूग्णालयात भरती केले. या फिचरमुळे अलिकडेच एका महिलेचा कार अपघात झाला असता तिच्या पतीला मॅसेज गेल्याने डॉक्टराची मदत मिळण्यापूर्वी पतीला तेथे पोहचता आले. आयफोन-14 हे फिचर वरदान ठरत असून सध्या केवळ इमर्जन्सी एसओएस व्हाया सॅटेलाईट हे फिचर अमेरीका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड आणि इंग्लंड या देशातील आयफोन ग्राहकांसाठी उपलब्ध असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In देश-विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…