no images were found
जंगलात सापडलेली हाडं श्रद्धाचीच; वडिलांचे डीएनए जुळले
नवी दिल्ली : श्रद्धा खून केसमध्ये जंगलात आफताबने दाखवलेल्या जागी हाडं सापडली होती. ती श्रद्धाचीच असल्याचं समोर आलं आहे. जंगलात सापडलेल्या हाडांची फॉरेन्सीक चाचणी करण्यात आल होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून हाडांची डीएनए आणि श्रद्धाच्या वडिलांचे डीएनए जुळले आहेत. हा पुरावा श्रद्धा मर्डर केसमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पुराव्याच्या आधारे आरोपी आफताब पुनावाला याला जास्तीतजास्त शिक्षा होऊ शकते.
यावर उज्ज्वल निकम म्हणाले की, फॉरेन्सींक अहवाल पोलिसांच्या तपासातील महत्त्वाचा टप्पा आहे. आफताबने पोलिसांसमोर कुबुली दिली होती. त्यानुसार पोलिसांनी जंगलातून हाडं गोळा केली होती. मात्र ती हाड कोणाची याचा प्रश्न होता. मात्र अहवालातून ते हाडं श्रद्धाचीच आहे, हे सिद्ध झालं असेल तर आफताबच्या विरुद्ध हा महत्त्वाचा परिस्थितीजन्य पुरावा ठरणार आहे. यावर आफताबला या हाडांवर स्पष्टीकरण देता आलं नाही, तर आफताबने श्रद्धाचा खुन केला हे सिद्ध होऊ शकतं, असंही निकम यांनी म्हटलं आहे .