Home क्राईम नदीच्या पाण्यात मोटार सोडत असताना विजेचा शॉक लागून चौघांचा जागीच मृत्यू

नदीच्या पाण्यात मोटार सोडत असताना विजेचा शॉक लागून चौघांचा जागीच मृत्यू

0 second read
0
0
35

no images were found

नदीच्या पाण्यात मोटार सोडत असताना विजेचा शॉक लागून चौघांचा जागीच मृत्यू

पुणे-सातारा महामार्गावरील निगडी (ता.भोर) येथे नदीपात्रात मोटार टाकत असताना विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यु झाला आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून मयत चौघेही निगडी गावातील आहेत. विठ्ठल सुदाम मालुसरे (वय.४५), सनी विठ्ठल मालुसरे (वय २६), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय ३६) आणि आनंदा ज्ञानेश्वर जाधव (वय ५५, सर्वजण रा निगडी) या चौघांचा मृत्यु झाला आहे.
निगडी गावच्या हद्दीत गुंजवणी नदीच्या पाण्यात बंधाऱ्याच्या बँकवॉटरमध्ये विठ्ठल मालुसरे यांची पाण्याची मोटार टाकण्याचे काम सुरु होते. त्यासाठी चौघेजण मोटार घेवून पाण्यात ढकलत होते. त्यावेळी विजेचा शॉक बसला. पाण्यात वीजेचा प्रवाह आल्यामुळे चौघांचाही जागीच मृत्यु झाला आहे. शेजारी शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा वीजप्रवाह बंद केला.
घटनेची माहिती मिळताच वीज महावितरणचे भोरचे उपअभियंता संतोष चव्हाण, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील, आमदार संग्राम थोपटे, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपटराव सुके, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, कुलदीप कोंडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पंचनाम्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. सनी व विठ्ठल मालुसरे या पितापुत्राचा आणि भावकीतील अमोल मालुसरे व गावातील आनंदा जाधव या चौघांचा जागीच मृत्यु झाल्यामुळे निगडी गावावर शोककळा पसरली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…