
no images were found
सामाजिक, सांस्कृतिक आशय शाब्द साहित्यातून शोधला पाहिजे–डॉ.मुकुंद कुळे
‘‘लोकसाहित्याच्या निर्मितीमागे समूह मनाची प्रेरणा काम करत असते. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक आशय शाब्द साहित्यातून शोधला पाहिजे. लोकसाहित्याचं संचित व्यक्तीचं न राहता समूह मनाचं होतं’’, असे प्रतिपादन डॉ. मुकुंद कुळे यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित‘लोकविद्या आणि लोकसंस्कृतीः अभ्यास आणि संवर्धन’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणूनते बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले, ‘‘परंपरेने चालत आलेल्या गोष्टी विवेकबुद्धीने स्वीकारून त्या पुढच्या पिढीकडे संक्रमित केल्या पाहिजेत. आता अशी कामे महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी हाती घेणे गरजेचे आहे.’’
तर या चर्चासत्रात डॉ. नीला जोशी आपल्या मनोगतामध्ये म्हणल्या की, ‘लोकजीवन, लोकमानस, लोकश्रद्धा यांचे सवंर्धन करणे काळाची गरज आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून लोकसाहित्याचे संकलन आणि संशोधन करणे ही आपली जबाबदारी आहे.’या कार्यशाळेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. रणधीर शिंदे उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रस्ताविक अभ्यासकेंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. या कार्यशाळेसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील समन्वयक उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे, आभारडॉ. सुखदेव एकल यांनी व्यक्त केले.