
no images were found
भाजपा आनंदोत्सव
कोल्हापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले. या विजयाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.
फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत नाचत आपला आंनद व्यक्त केला. यांनातर मान्यवरांच्या हस्ते साखर पेढ्याचे वितरण देखील करण्यात आलभारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
याप्रसंगी राहूल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, सत्यजित उर्फ नाना कदम, दिलीप मेत्राणी, हेंमत आराध्ये, गणेश देसाई, अमोल पालोजी, गायत्री राऊत, सुनीता सूर्यवंशी,प्राची कुलकर्णी, लता बरगे, प्रदीप उलपे, राजू मोरे, संजय सावंत, महेश यादव, सुनील पाटील, विवेक वोरा, रमेश दिवेकर, सचिन सुतार, सुनीलसिंह चव्हाण, रवींद्र मुतगी, विशाल शिराळकर, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.