no images were found
साठमारी परिसरातील घरफाळ्याची थकबाकी न भरल्याने आठ गाळे सील : २९ लाख १५ हजार रुपयांची घरफाळा थकबाकी, गांधी मैदान विभागीय कार्यालयाची कारवाई
कोल्हापूर, : महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली (घरफाळा) विभागामार्फत घरफाळ्याची थकबाकी वसुलीसाठी कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या अंतर्गत घरफाळा विभागीय कार्यालय क्र. १, गांधी मैदान व उपद्रव शोध पथकाच्या संयुक्त पथकाने गोखले कॉलेजजवळील साठमारी परिसरातील सर्व्हे क्र. २६१२ मधील शेड मालक राजाराम गोविंद नाईक यांच्या आठ गाळ्यांवर सीलची कारवाई केली. संबंधित शेड मालकाकडे २९ लाख १५ हजार ३३ रुपयांची घरफाळा थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त परितोष कंकाळ व सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी अधीक्षक दत्तप्रसाद माजगावकर, विभागातील सर्व लिपिक तसेच उपद्रव शोध पथकाचे जवान उपस्थित होते.