Home Uncategorized लक्ष्मीपुरीतील थकीत घरफाळा व विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या दोन आस्थापना सील : थकबाकीपोटी २ लाख २० हजार रुपयांचा कर वसूल

लक्ष्मीपुरीतील थकीत घरफाळा व विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या दोन आस्थापना सील : थकबाकीपोटी २ लाख २० हजार रुपयांचा कर वसूल

15 second read
0
0
13

no images were found

लक्ष्मीपुरीतील थकीत घरफाळा व विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या दोन आस्थापना सील : थकबाकीपोटी २ लाख २० हजार रुपयांचा कर वसूल

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परवाना विभाग, घरफाळा विभागीय कार्यालय क्र. २ (छत्रपती शिवाजी मार्केट) आणि उपद्रव शोध पथकाच्या संयुक्त पथकाने लक्ष्मीपुरी परिसरात कारवाई करत थकीत घरफाळा व विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या दोन व्यावसायिक आस्थापना सील केल्या. तसेच थकबाकीपोटी २ लाख २० हजार रुपयांचा कर वसूल केला. संबंधित आस्थापनांना नवीन व्यवसाय परवाना घेणे तसेच भाडेकरार सादर करण्याबाबत यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित व्यावसायिकांनी नोटिसांनंतरही कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे महापालिकेच्या संयुक्त पथकाने सीलबंद करण्याची कारवाई केली.

            ही कारवाई आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या निर्देशानुसार उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे आणि कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये अधीक्षक अशोक यादव, उपद्रव शोध पथकाचे अशोक साठे, विनोद रुईकर, भोलानाथ पाटणकर तसेच घरफाळा व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

            शहरातील सर्व मिळकतधारक व व्यावसायिकांनी आपल्याकडील थकीत घरफाळा व इतर करांची रक्कम तातडीने भरून आवश्यक परवाने व भाडेकराराची पूर्तता करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा -मुख्यमंत्री देवेंद्…