Home Uncategorized तंबाखू मुक्त युवा अभियान ४.०: बाजार भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जनजागृती रॅली संपन्न

तंबाखू मुक्त युवा अभियान ४.०: बाजार भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जनजागृती रॅली संपन्न

14 second read
0
0
14

no images were found

तंबाखू मुक्त युवा अभियान ४.०: बाजार भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जनजागृती रॅली संपन्न

     कोल्हापूर, : युवकांमध्ये तंबाखू सेवनास प्रतिबंध करणे, तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे आणि तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे या उद्देशाने भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत  ‘तंबाखू मुक्त युवा अभियान ४.०’ राबविण्यात येत आहे.या ६० दिवसीय देशव्यापी अभियानाचा शुभारंभ नुकताच नवी दिल्ली येथे पार पडला. या अभियानाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत विविध प्रभावी उपक्रम राबविले जात आहेत.

      याच मोहिमेचा एक भाग म्हणून, पन्हाळा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,बाजार भोगाव या ठिकाणी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉ.व्ही.ए आरळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जन जागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

     यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री आरळेकर यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम तसेच कर्करोगासारखे आजार आणि कुटुंबाची होणारी हानी याबाबत  माहिती दिली त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन व धूम्रपान बंदी कायदा, ‘तंबाखूमुक्त शाळा’ आणि ‘तंबाखूमुक्त गाव’ संकल्पना यशस्वी करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

       या जनजागृती रॅलीमध्ये बाजार भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश जाधव,परिसरातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक/सेविका,आशा स्वयंसेविका व आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने  सहभागी झाले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा -मुख्यमंत्री देवेंद्…