Home Uncategorized जागतिक शौचालय दिनानिमित्त कोल्हापूर शहरात विशेष स्वच्छता अभियान

जागतिक शौचालय दिनानिमित्त कोल्हापूर शहरात विशेष स्वच्छता अभियान

22 second read
0
0
12

no images were found

जागतिक शौचालय दिनानिमित्त कोल्हापूर शहरात विशेष स्वच्छता अभियान

कोल्हापूर : जागतिक शौचालय दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालये तसेच परिसरामध्ये विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

            या अभियानांतर्गत शहरातील सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहांमधील आवश्यक सुविधांची तपासणी तसेच शौचालय परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या सर्व स्वच्छता निरीक्षकांना आपापल्या कार्यक्षेत्रातील शौचालयांची सखोल स्वच्छता करून घेण्याच्या सूचना उपायुक्त परितोष कंकाळ व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.

            या मोहिमेदरम्यान आज शहरातील स्वच्छता वॉर्ड अंतर्गत 65 सार्वजनिक शौचालय स्वच्छतेबाबत तपासणी करण्यात आली. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, शहर समन्वयक मेघराज चडचणकर, विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, आरोगय निरिक्षक भूमी कदम यांनी तपासणी केली.

            या मोहिमेअंतर्गत शहरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालये स्वच्छ, सुरक्षित व वापरण्यायोग्य ठेवणे, नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करणे आणि शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. तरी, नागरिकांनीही सार्वजनिक शौचालयाचा योग्य वापर करुन पाण्याचाही वापर भरपूर करावा तसेच आपले शौचालय स्वच्छ ठेवावीत असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा -मुख्यमंत्री देवेंद्…