Home Uncategorized सेझरॅककडून अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट लाँच, ज्यासह गोव्यात आपल्या व्हिस्की पोर्टफोलिओचा विस्तार केला

सेझरॅककडून अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट लाँच, ज्यासह गोव्यात आपल्या व्हिस्की पोर्टफोलिओचा विस्तार केला

0 second read
0
0
28

no images were found

सेझरॅककडून अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट लाँच, ज्यासह गोव्यात आपल्या व्हिस्की पोर्टफोलिओचा विस्तार केला

गोव्यात लाँच झालेले अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट भारतातील व्हिस्कीप्रेमींना अमेरिकन व्हिस्कीची खास चव देणार

मुंबई: सेझरॅक कंपनी या जगातील सर्वात मोठ्या डिस्टिल्ड स्पिरिट्स कंपनीने आज गोव्यात कोणताही कृत्रिम फ्लेव्हर नसलेली अमेरिकन वुल्फ डबल गोल्ड ब्लेंडेड व्हिस्की आणि साउदर्न कम्फर्ट रिझर्व्ह व्हिस्कीच्या लाँचची घोषणा केली. हे दोन्ही ब्रँड्स संपूर्ण गोव्यात उपलब्ध असतील, जे भारतातील त्यांच्या विस्ताराचा पुढचा टप्पा दर्शवतात. हे दुहेरी लाँच जगातील सर्वात मोठ्या व्हिस्की बाजारपेठ भारतातील सेझरॅकच्या वाढत्या उपस्थितीवर आधारित आहे. या माध्यमातून भारतीय ग्रेन आणि माल्ट स्पिरिट्सच्या मिश्रणासह अमेरिकन व्हिस्कीची खास चव आणि वैशिष्ट्य देणारे दोन वेगळे प्रकार भारतातील ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.

“गोव्यामध्ये विविध आवडीनिवडी असलेले आणि नवीन गोष्टींचा अनुभव घेण्याची इच्छा असलेले ग्राहक एकत्र येतात, ज्यामुळे अमेरिकन वुल्फ आणि साउदर्न कम्फर्ट रिझर्व्ह व्हिस्कीसाठी ही अत्यंत उत्साहवर्धक बाजारपेठ ठरते,” असे सेझरॅकचे ग्लोबल मार्केटिंग व्हॉइस प्रेसिडेंट डिएगो बिआंची म्हणाले. “प्रत्येक ब्रँडचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य आहे – अमेरिकन वुल्फ हे धाडस, महत्त्वाकांक्षा आणि वेगळेपणावर आधारित आहे, तर साउदर्न कम्फर्ट सहजता, सुलभता आणि आरामाचा अनुभव देते. आम्हाला गोव्यातील व्हिस्कीप्रेमींसाठी हे दोन्ही प्रकार सादर करताना आनंद होत आहे, ज्यामुळे त्यांना वेगवेगळ्या चवी आणि प्रसंगांनुसार अधिक पर्याय उपलब्ध होतील.”

अमेरिकन वुल्फ: व्हिस्कीची नवीन श्रेणी

अमेरिकन वुल्फ अद्वितीय मिश्रणाद्वारे भारतातील ग्राहकांसाठी व्हिस्कीची नवीन श्रेणी घेऊन येत आहे. यात कोणत्याही कृत्रिम फ्लेवरचा वापर न करता अस्सल अमेरिकन व्हिस्कीचे वैशिष्ट्य आणि निवडक भारतीय ग्रेन व माल्ट स्पिरिट्स एकत्र केले आहेत. ठाम आणि वेगळी ओळख असणारी अमेरिकन वुल्फ आपली वेगळी ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या आजच्या व्हिस्कीप्रेमींसाठी तयार करण्यात आली आहे. नीट, बर्फासोबत किंवा सोड्यासोबत आनंद घेता येईल अशा पद्धतीने डिझाइन केलेली ही व्हिस्की अमेरिकन व्हिस्कीपासून प्रेरित असलेली बोल्ड चव भारतातील बाजारपेठेत आणते. अमेरिकन वुल्फ सुरुवातीला ७५० मिली व १८० मिली या पॅकमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये ७५० मिली बाटलीची किंमत संबंधित राज्याचे कर आणि किमतींच्या नियमांनुसार साधारण ३७० रूपये असेल.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा -मुख्यमंत्री देवेंद्…