no images were found
स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत महिलांना ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण संपन्न
कोल्हापूर : बँक ऑफ इंडियाद्वारा प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर तर्फे महिलांसाठी 30 दिवसांसाठीच्या मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची 30 नोव्हेंबर रोजी सांगता झाल्याची माहिती आरसेटीचे संचालक कुलभूषण उपाध्ये यांनी दिली.
प्रशिक्षणासाठी बचत गटातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. करवीर, पन्हाळा, गगनबावडा, शिरोळ, आणि राधानगरी तालुक्यातील ३४ महिलांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान महिलांना एच डी मेकअप, फेशियल, ब्रेडिंग, वैक्सिंग, पेडीक्योर, मैनीक्योर केसांचे कटिंग, मेहंदी, कलरिंग, ट्रीमिंग अशा विविध कौशल्याबरोबरच उद्योजकीय ज्ञान देण्यात आले. त्याच बरोबर बँक कर्ज प्रस्ताव मार्गदर्शन, विविध शासकीय योजना, सुरक्षा योजना यांचीही माहिती प्रशिक्षणातून देण्यात आली.
प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी बँक ऑफ इंडियाच्या एस. एम. ई. सिटी मुख्य प्रबंधक कुसुम हुजुरे म्हणाल्या, ‘ब्युटी पार्लर’ हे प्रशिक्षण घेतल्या नंतर स्वतः चा व्यवसाय सुरु करून महिलांनी स्वावलंबी बनावे. बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर कर्जाचा व्यवसायासाठीच योग्य वापर करा. याप्रसंगी ३४ प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. कार्यक्रमासाठी स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी)चे संचालक कुलभूषण उपाध्ये, तांत्रिक प्रशिक्षिका बिना रेळेकर आणि स्वप्रा जामदार, आरसेटी श्रेष्ठता केंद्राचे प्रतिनिधी डी. आर. नाईक, अमृता साठे, कौशल्य समन्वयक साक्षी संघमित्रा व आरसेटीचे सुधीर हर्डीकर, अनिल कांबळे, आसिफ जमादार आणि युवराज काशिद उपस्थित होते.