कॅथेटर संसर्ग रोखण्यासाठी इंडोल-इम्प्रेग्नेशन तंत्रज्ञान यशस्वी:डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना यश कोल्हापूर (प्रतिनिधी):रुग्णालयांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या आणि गंभीर मानल्या जाणाऱ्या कॅथेटर-अॅसोसिएटेड युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (CAUTI) वर नियंत्रण मिळवण्यासाठी इंडोल-इम्प्रेग्नेटेड सिलिकॉन युरीनरी कॅथेटरचे अभिनव संशोधन करण्यात डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकाना यश आले आहे. कॅथेटरच्या पृष्ठभागावर बायोफिल्म तयार होण्यास प्रतिबंध करून संसर्गाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करण्यास हे संशोधन उपयुक्त ठरणार …