Home आरोग्य आरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज – ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन: -डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग कोल्हापूरमधे आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

आरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज – ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन: -डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग कोल्हापूरमधे आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

22 second read
0
0
19

no images were found

आरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज – ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन: -डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग कोल्हापूरमधे आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

   कोल्हापूर (प्रतिनिधी):आरोग्य विज्ञान क्षेत्र झपाट्याने बदलत असून, गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी अधिकाधिक संशोधनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन एएफएमसी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन यांनी केले. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे आयोजित ‘ब्लेंडिंग एव्हिडन्स: अ‍ॅडव्हान्सिंग हेल्थ सायन्सेस थ्रू मिक्स मेथड्स रिसर्च’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

        सयाजी हॉटेलच्या मेघमल्हार सभागृहात ही दोन दिवसीय परिषद संपन्न झाली. यावेळी ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राकेश कुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

         यावेळी बोलताना ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन म्हणाल्या, आरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज आहे. बदलत्या आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी नवनवीन संशोधन पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे. मिश्र पद्धती संशोधनामुळे रुग्णसेवा, शिक्षण आणि क्लिनिकल निर्णय प्रक्रियेत अधिक अचूकता येते. नर्सिंग क्षेत्रातील संशोधनाने आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम बनवण्याची क्षमता आहे. युवा संशोधकांनी आंतरशाखीय पद्धती स्वीकारून नवकल्पनांना प्रोत्साहन द्यावे. तसेच विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी संशोधन संस्कृती जोपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार प्रकाशने करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

       डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, संशोधन ही केवळ शैक्षणिक गरज नसून ती समाजपरिवर्तनाची प्रक्रिया आहे. आरोग्य क्षेत्रात संशोधनाच्या माध्यमातून नवे मानदंड निर्माण करता येतात. संशोधकांनी समाजाच्या गरजा आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून अभ्यासाची रचना करावी. तसेच युवा संशोधकांनी चिकित्सक दृष्टीकोन ठेवून गुणवत्तापूर्ण आणि समाजोपयोगी संशोधन करण्याचा संकल्प करावा.

       डॉ. राकेशकुमार शर्मा म्हणाले, आरोग्य विज्ञान क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संशोधन संस्कृतीची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. विद्यापीठ स्तरावर आंतरशाखीय) संशोधनाला प्रोत्साहन देऊन जागतिक दर्जाचे निष्कर्ष निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

        या परिषदेत मिश्र पद्धती संशोधनाचे महत्त्व आणि भविष्यातील दिशा यावर विचारमंथन झाले. या परिषदेत डॉ. एस.जे. नालिनी, डॉ. बी. नायक, डॉ. शालिनी नायक, डॉ. आशा सोलोमोन, डॉ. विष्णू रंजीत (रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स, आयर्लंड), डॉ. कर्पगम सेतू (सेंट लुईस विद्यापीठ, मिसुरी, अमेरिका), डॉ. अमोल डोंगरे, डॉ. श्यामला रामासामी (इंटरनॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी, क्वालालंपूर, मलेशिया) यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.

      यावेळी डॉ. शिरीष पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आय. क्यू. ए. सी. संचालिका डॉ. शिंपा शर्मा, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. उमराणी जे., प्रो मनीषा बिजापूरकर, डॉ सुनील आवटी यांच्यासह नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

        कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…