no images were found
कोल्हापूरात फॅब्रिकेअर- डी’डेकोरच्या भव्य शोरूम; प्रीमियम होम डेकोरचा नवा अनुभव
कोल्हापूर, कोल्हापूर शहरातील शाहूपुरी येथे डी’डेकोर होम फॅब्रिक्सतर्फे त्यांच्या अग्रगण्य होम फर्निशिंग व उच्च-कार्यक्षमता फॅब्रिक्स ब्रँड्स ‘फॅब्रिकेअर’ आणि ‘डी’डेकोर’ यांच्या नवीन शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.
हे चैतन्यमय खरेदीचे ठिकाण उत्कृष्ट डिझाइन्स, दर्जेदार निवड आणि तल्लीन करणाऱ्या अनुभवाचा संगम साधत कोल्हापूरच्या निवासी घरधारक, वास्तुविशारद आणि इंटिरियर डिझायनर्ससाठी खास साकारण्यात आले असून, गृहसजावटीच्या खरेदीत नवा मापदंड प्रस्थापित करत आहे.
शोरूमच्या प्रवेशद्वारापासूनच आकर्षक मांडणी आणि विस्तृत कलेक्शनमुळे हे ठिकाण लक्ष वेधून घेते. घरमालक, वास्तुविशारद आणि इंटिरियर डिझायनर्सना प्रेरणा देण्यासाठी सुसज्ज या शोरूममध्ये फॅब्रिकेअरच्या संपूर्ण उत्पादन श्रेणीचा समावेश असून, त्यात आलिशान, सहज स्वच्छ होणारे पडदे, अपहोल्स्ट्री फॅब्रिक्स, इनडोअर-आउटडोअर फॅब्रिक्स, ब्लॅकआउट पडदे तसेच घरी धुता येणारे पडदे आदींचा समावेश आहे. यासोबतच फॅब्रिकेअरच्या रग्स आणि ब्लाइंड्सच्या नव्या कलेक्शनचीही पाहणी करता येते. तसेच डी’डेकोरचे आकर्षक अपहोल्स्ट्री व पडद्याचे कापड, बेडिंग आणि वॉलपेपर्सही येथे उपलब्ध आहेत. शोरूममधील प्रत्येक विभाग ग्राहकांना प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना साकार करण्यासाठी प्रेरित करतो.
या शोरूममध्ये डी’डेकोरच्या ‘फिट-टू-परफेक्शन’ सेवेद्वारे मागणीनुसार तयार होणारे फॅक्टरी-फिनिश पडदे, ‘’स्टाईल एक्सपर्ट सर्व्हिस’ अंतर्गत व्यावसायिक डिझाइन निवड सेवा, स्वयंचलित ब्लाइंड्स, मुलांसाठी खास डिझाइन केलेले बेडिंग तसेच आधुनिक जीवनशैलीला अनुरूप अशा विविध उत्पादनांचे वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण करण्यात आले आहे.
तसेच या शोरूमच्या माध्यमातून डी’डेकोर होम फॅब्रिक्स भारतातील होम डेकोर रिटेल क्षेत्राला नव्याने आकार देत आहे. उत्पादनातील नाविन्य, स्मार्ट डिझाइन आणि ग्राहक-केंद्रित सेवांचा संगम साधत, ब्रँड आकर्षक व उपयुक्त जागा निर्माण करण्यात आघाडीवर आहे. फॅब्रीकेर आणि डी’ डेकॉर आपले नेटवर्क विस्तारत असताना, शाहूपुरीतील हा शोरूम प्रीमियम दर्जा, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि आकर्षकतेचा संगम घडवणाऱ्या नव्या टप्प्याची नांदी ठरत आहे