Home शैक्षणिक माहितीचा अधिकार कायद्याची व्यापक जनजागृती आवश्यक

माहितीचा अधिकार कायद्याची व्यापक जनजागृती आवश्यक

1 second read
0
0
127

no images were found

माहितीचा अधिकार कायद्याची व्यापक जनजागृती आवश्यक

उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग टाळून समाजात या कायद्याबद्दल व्यापक जनजागृती होणे  गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी केले.

दिनांक 28 सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्हा परिषद व शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंपर्क विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विभाग प्रमुख डॉ निशा मुडे-पवार, सहाय्यक प्राध्यापक डॉ शिवाजी जाधव, सहाय्यक प्राध्यापका डॉ सुमेधा साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनीषा देसाई म्हणाल्या, माहितीचा अधिकार कायद्याचे महत्व समाजातील अधिकाधिक घटकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. याकामी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. सध्या समाजात काही लोक या कायद्याचा दुरुपयोग करत आहेत. दरम्यान या कार्यशाळेत माहितीचा अधिकार पुस्तिकेचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती व्हावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ.निशा मुडे-पवार यांनी केले. तर आभार प्राजक्ता शहा यांनी मानले. यावेळी पत्रकारिता व  जनसंवाद विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे क…