चाकण शहरामध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये दहशत पुणे : जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर हे तालुके बिबट्याचे वास्तव्य असलेले समजले जातात. त्यातच चाकण शहरात असणाऱ्या एकता नगर परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांत मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या डरकाळ्याचा आवाजाने नागरिक दहशती खाली असल्याचे पहायला मिळत आहे. एकता नगर परिसरातील ग्लॅडिओलस इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरातील उसाच्या शेतात बिबट्याने नागरिकांना दर्शन …