
no images were found
ठाकरे गटाचा महापालिकेवर घागर मोर्चा
कोल्हापूर : शहरातील काही भागात दुषित पाणी व कित्येक ठिकाणी अपुरा पाणी पुरवठ्यामुळे पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.येत्या काळात जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. तर गलथान कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना महिला शिवसैनिक काळे फासल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने महापालिकेसमोर पाणी प्रश्नासंबधी आयोजित केलेल्या आंदोलनप्रसंगी देण्यात आला.
कोल्हापूर शहरात सद्य स्थितीत शहरात ठराविक ठिकाणी दुषित पाणी व अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे. तर काही ठिकाणी दिवसातील २४ तास पाणी पुरवठा केला जात आहे. याबाबत वेळोवेळी प्रशासनास जाब विचारला तर निरुत्तर होते. कोणावरही जबाबदारी ढकलून हात झटकले जात आहेत. नागरीकांची दिशाभुल करून माजी नगरसेवकांना बदनाम केले जात आहे. याबाबत त्वरीत कार्यवाही करून पाणी पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा पाणी पुरवठा विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांना महिला शिवसैनिक तोंडाला काळे फासल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. पाणी पुरवठा विभागअधिकारी व प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणला.
यादरम्यान शिवसैनिकांनी महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तावरील पोलिसांनी प्रवेशद्वारावर आंदोलकांना अडविले. अडविल्यानंतर कार्यकर्त्यांनी तेथेच सोबत आणलेल्या घागरींसह ठिय्या मारला. याबाबतचे निवेदन जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी स्विकारले.