
no images were found
नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
कोकणच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्णत्वास येईल. नवीन वर्षात नागरिकांसह पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या महामार्गावर प्रवास करता येईल, असे मत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाय योजना कराव्यात यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.देशात दरवर्षी ५ लाख अपघातात दीड लाख मृत्यूमुखी पडतात असे सांगत हे अपघात टाळण्यासाठी समिती तयार करण्यात आल्याचे नितिन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी रायगड दौर्यावर आले असून यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते कासु या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भुमीपुजन केले. यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते.
पावसाळ्यापुर्वी एका बाजूचा रस्ता तर पावसाळ्यानंतर दुसऱ्या बाजूचा रस्ता पुर्ण केला जाणार आहे. रस्त्याच्या कामावर दररोज ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवली जाणार आहे. तर कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रय़त्न केला तर त्यांच्या विऱोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे रस्त्याच्या कामावर दैनंदीन देखरेख ठेवणार आहेत. त्यामुळे येत्या महिन्याभरात या रस्त्याच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे
कार्यक्रमात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी वाढत्या रस्ते अपघातांवर चिंता व्यक्त केली. कोविडमुळे, युद्धामुळेही मरत नाहीत, त्यापेक्षा जास्त जीव रस्ते अपघातात गमवावे लागतात असे म्हणत लेन डिसिल्पिनचे महत्व नितीन गडकरी यांनी विषद केले. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी अपघात निवारण समिती स्थापन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या समितीच्या मार्फत दर दोन महिन्यांनी ब्लॅक स्पॉट, अपघात स्थळांची पाहणी करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या…
यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी सॅटेलाईट टोलनाक्यांची नवी संकल्पना बोलून दाखवली. या पुढे टोल नाके रद्द करणार असून सॅटेलाईट बेस टोलनाके सुरु करण्याचा विचार असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे काम यावर्षी डिसेंम्बरच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न असल्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला…