जागतिक संगीत व योग दिनानिमित्त संगीतसभेचे आयोजन कोल्हापूर (प्रतिनिधी): जागतिक संगीत व योग दिनानिमित्त शुक्रवार, दि. २१ जून रोजी शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने ‘योग संगीत’ या संगीतसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘फिजिकल- मेंटल-इमोशन्ल हेल्थ हीच खरी वेल्थ’ अशी संकल्पना घेऊन सादर होणार्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका व योगतज्ञ डॉ. भाग्यश्री ज्ञानेश मुळे, प्रसिद्ध हार्मोनियम व सिंथेसायझरवादक डॉ. …