no images were found
डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी इटली येथे निवड
इचलकरंजी(प्रतिनिधी) : येथील डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील तीन विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी इटली मधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड झालेली आहे. या निवडीमुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची परदेशात उच्च शिक्षण घेण्याची परंपरा कायम राहीली आहे. सुमित संजय साळुंखे याची एम.एस इन मेकॅनिकल इंजिनिअरसाठी इटली, रोम येथील ‘युनिर्व्हर्सिटी ऑफ सपाईन्झा’ मध्ये निवड झालेली आहे या विद्यापीठाचे क्युएस रॅकिंग १३२ आहे. संकेत गणेश गायकवाड याची एम.एस. इन ‘ऍटोमेशन इंजिनिअरींग साठी युनिर्व्हर्सिटी ऑफ बोलोंनगा‘, इटली मध्ये निवड झाली आहे या विद्यापीठाचे क्युएस रॅकिंग १३३ आहे तर शिवेंद्र संदिप देशमुख याची एम.एस. इन ‘ऍटोनोमॉस व्हेईकल इंजिनिअरींग’ साठी युनिर्व्हर्सिटी ऑफ नॅपल्स फेड्रिको मध्ये निवड झाली आहे या विद्यापीठाचे क्युएस रॅकिंग ३३५ आहे.
निवड झालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांना विद्यापीठांकडून ७ लाखाची शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळालेली आहे याशिवाय राहायची सोय व विद्यावेतन देखील मिळाले आहे. डीकेटीईमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग अभ्यासक्रमातील मेटॅलर्जी, मशिन टुल्स ऍड प्रोसेसिंग, वर्कशॉप प्रॅक्टीस, टूल इंजिनिअरींग मेकॅट्रॉनिक्स इंडस्ट्रीयल ऍटोमेशन, हायड्रॉलिक्स व न्युमॅटिक्स या विषयांचा विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी फायदा झालेला आहे. तसेच मेकॅनिकल विभागातील स्मार्ट फौन्ड्री, बॉश लॅब, मॅन्युफॅक्चरींग प्रोसेस या लॅबमध्ये घेतलेल्या ट्रेनिंगचा व केलेल्या प्रोजेक्टचा देखील त्यांना निवडीसाठी फायदा झालेला आहे. विद्यार्थ्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणा-या जी.आर.ई. व आई.एल.टी.एस. परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे.
चौकट डॉ सपना आवाडे- डीकेटीईचे २९ हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी सामंजस्य करार आहेत. डीकेटीईच्या विद्यार्थ्यासाठी या करारामुळे जगभर शिक्षणाची सर्व दालने खुली आहेत यामुळे परदेशात आंतराराष्ट्रीय स्तरावर गगनभरारी घेण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होत आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी डीकेटीईने निर्माण केलेल्या संधीमुळे टेक्स्टाईल व इंजिनिअरींग क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटला आहे डॉ सपना आवाडे यांनी यावेळी गौरवाउदगार काढले.
विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेचे प्र. संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ. यु.जे. पाटील, विभागप्रमुख प्रा.डॉ. व्ही.आर. नाईक, व अन्य प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.