no images were found
शिवाजी विद्यापीठात ज्वेलरी डिझाईनिंग कार्यशाळा
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात येत्या शनिवारी (१३ जुलै) कॅड/कॅम व थ्रीडी प्रिंटींग तंत्रज्ञान वापरून ज्वेलरी डिझाईनिंग करण्याबाबत विशेष एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभागाचे इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल, हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फौंडेशन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट, सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेस् आणि एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता तंत्रज्ञान अधिविभागाच्या सभागृहामध्ये कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात येईल. या प्रसंगी ज्वेलरी डिझाईन तज्ज्ञ सुहास हजारे, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. शिवलिंगप्पा सपली, बी.टेक. मॅकेनिकल अभियांत्रिकीचे समन्वयक डॉ. अजित कोळेकर मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकांनी मोठ्या संख्येने कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.