no images were found
परशुराम वडार यांना संगणकशास्त्रात पीएचडी
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठातील परशुराम शंकर वडार यांना विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत संगणकशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. संगणकशास्त्र अधिविभागातील डॉ. उर्मिला पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली “डायग्नॉसिस ऑफ थायरॉइड: अ मशीन लर्निंग अप्रोच” या विषयावर त्यांनी शिवाजी
विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला. सध्या मधुमेहाखालोखाल थायरॉईडसंबंधित आजारांची व्याप्ती वाढत आहे. या आजारांमध्ये खूप गुंतागुंत असते.
थायरॉइडविषयक रोगाचे अचूक निदान करण्यासाठी मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करुन वडार यांनी या संशोधनांतर्गत नवीन मॉडेल विकसित केले आहे. परशुराम वडार हे मूळचे किणी (ता. हातकणंगले) येथील असून कॉम्प्युटर सायन्स आणि अॅप्लिकेशन या विषयात ते नेट व सेट या परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत. संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. कविता ओझा, डॉ. व्ही. एस. कुंभार, डॉ. व्ही. पी. भोसले, डॉ. एन. सी. माळी, हॉर्मोकेअर हॉस्पिटलचे डॉ. अमित असलकर, डॉ. प्रकाश पवार, डॉ. आर. आर. मुधोळकर यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांचेही त्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभले. वडील शंकर वडार आणि आई बबुताई वडार यांचेही सहकार्य लाभले.